For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बांदा पुलावरून क्रेटा कोसळली ओहोळात ; सनरुफ उघडल्याने चौघे बचावले

11:53 AM Jul 03, 2025 IST | अनुजा कुडतरकर
बांदा पुलावरून क्रेटा कोसळली ओहोळात   सनरुफ उघडल्याने चौघे बचावले
Advertisement

मध्यरात्रीची घटना ; बांदा पोलिस बनले देवदूत

Advertisement

मयुर चराटकर
बांदा
मुंबई- गोवा महामार्गावर बांदा बसस्थानक नजीक असलेल्या दुसऱ्या पुलावरून भरधाव वेगात असलेली क्रेटा कार मध्यरात्री एकच्या सुमारास ओहोळात कोसळली. या गाडीत चारजण होते. सुदैवाने गाडीचा सनरुफ उघडल्याने हे चारहीजण बचावले. सनरुफ उघडल्याने एकाने बाहेर येत महामार्गांवरुन जाणाऱ्या गाड्यांना मदत कार्यासाठी विनवणी केली. दरम्यान अन्य तिघेजण गाडीच्या टफावर उभे राहून मदतीसाठी आरडाओरड करत होते. दरम्यान गस्ती वर असलेल्या पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तुडुंब भरलेल्या ओहळातून त्यांना बाहेर काढले. प्रथम त्यांना लाईफ जॅकेट देत दोरीच्या सह्यायाने बाहेर काढले यात चारही जण सुखरूप असुन त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. सदरचे वाहन सावंतवाडीहुन गोव्याच्या दिशेने जात होते. यावेळी पोलीस कर्मचारी श्री भोगले, राजाराम कापसे, रोहित कांबळे, दाजी परब या पोलीस कर्मचाऱ्यांनी या तिघांचे प्राण वाचवले. या सर्व कर्मचाऱ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.