महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

गांधीनगर पुलावर कारने घेतला पेट

11:23 AM Sep 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सुदैवाने जीवितहानी टळली, चिंचमार्केटमध्ये तीन मोटारसायकली जळाल्या

Advertisement

बेळगाव : पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील गांधीनगर पुलावर कारला आग लागली. शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून आगीत कारचे नुकसान झाले आहे. मात्र, सुदैवाने कोणालाही इजा पोहोचली नाही. मारुती-800 कारला आग लागली आहे. होसूर, ता. सौंदत्ती येथील जगदीश चन्नाप्पा बुदिहाळ यांची ती कार असून माळमारुती पोलीस स्थानकात घटनेची नोंद झाली आहे. जगदीश व आणखी एक जण कारमधून जात होते. कार पुलावर आल्यानंतर इंजीनमधून धूर आला. त्यांनी कार बाजूला उभी केली. बघता बघता कारने पेट घेतला. तातडीने अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. जवानांनी पाण्याचे फवारे मारून आग आटोक्यात आणली. माळमारुती पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला आहे. केवळ सुदैवाने या घटनेत कोणाला इजा पोहोचली नाही.

Advertisement

शॉर्टसर्किटने मोटारसायकली खाक

चिंच मार्केटजवळ शॉर्टसर्किटने तीन मोटारसायकली जळून खाक झाल्या आहेत. शॉर्टसर्किट होऊन ठिणग्या उडाल्यामुळे ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेची माहिती समजताच माळमारुतीचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article