खचत चाललेले शहर
घर सोडून पलायन करत आहेत लोक
उत्तराखंडच्या जोशीमठमध्ये जमीन खचण्याची घटना मागील वर्षी घडली होती. सातत्याने घडणाऱ्या अशा घटनांमुळे या शहराला ‘सिंकिंग झोन’ घोषित करण्यात आले आहे. परंतु हे एकमात्र शहर नाही ज्याची जमीन खचत आहे. रशियातील एक शहर हळूहळू जमिनीत सामावत चालले आहे. या शहराचे नाव बेरेज्निकी असून ते यूरालच्या पर्वतांवर आहे. या शहराची एकूण लोकसंख्या 1 लाख 50 हजारांपेक्षा अधिक होती. परंतु हे शहर खचण्यामागे एक कहाणी आहे.
या शहराला थेट पोटाश खाणीच्या वर निर्माण करण्यात आले होते. हा प्रकार सोव्हियत काळात सामान्य होता. पोटॅश मिळविण्यासाठी याचे सातत्याने खनन होत राहिले. अशा स्थितीत अनेक वर्षांपर्यंतच्या उत्खननानंतर शहराच्या जमिनीखाली खोल ख•s तयार झाले. हे ख•s एखाद्या गुहेप्रमाणे होते. या विशाल भूमिगत गुहांचे छत मिठाच्या भींत आणि स्तंभांवर टिकलेले आहे. अशा स्थितीत 2006 साली पृष्ठभागापासून सुमारे 720 ते 1500 फूट खोल खाणीत मिठाच्या पाण्याचा झरा वाहू लागला, यामुळे मिठाच्या भिंती आणि स्तंभ नष्ट झाले. यामुळे जमिनीवर उभारण्यात आलेल्या इमारती अचानक खचल्या. शहराचे अनेक हिस्से या सिंकहोलमुळे प्रभावित झाले. परंतु त्यात सर्वात मोठा ‘द ग्रँडफादर’ हा सिंकहोल सुमारे 400 मीटर रुंद आणि 200 मीटरपेक्षा अधिक खोल आहे.
या प्रकारामुळे पोटॅश खाणींपर्यंत जाणारा एकमात्र रेल्वेमार्ग धोक्यात आला आहे. बेरेज्निकी शहरातून जगातील 10 टक्के पोटॅश प्राप्त होते. याचमुळे येथील लोकांना रोजगार प्राप्त होतो. अशा स्थितीत या खाणी बंद केल्यास स्थानिक अर्थव्यवस्थेला फटका बसणार आहे. परंतु शहरातील अनेक हिस्से पूर्णपणे जमिनीत सामावले गेले आहेत. परंतु आता यापासून वाचण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. यात व्हिडिओ सर्व्हिलान्स सिस्टीम, भूकंपीय सेंसर, नियमित सर्वेक्षण, छत, फुटपाथ आणि रस्त्यांच्या उंचीमधील परिवर्तनाची सॅटेलाइट समवेत उच्च तंत्रज्ञानयुक्त उपकरणांद्वारे पाहणी बेरेज्निकीमध्ये केली जाते.
शहराला हलविण्याची योजना
जमीन खचल्याने येथील अधिकारी आणि खाणकंपन्या आता या शहराला तेथे वाहणाऱ्या कामा नदीच्या दुसऱ्या तिरावर वसविण्याची योजना आखत आहेत. नवा सिंकहोल निर्माण होणार नसल्याचा दावा इंजिनियर्सनी केला आहे. 2019 च्या पूर्वी सुमारे 12 हजार लोकांनी बेरेज्निकी येथून स्थलांतर केले आहे. तर येथे वास्तव्य करणाऱ्या लोकांवर करडी नजर ठेवली जाते.