For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Hatkanangale | चिमुकल्या हातांनी मांडला व्यापाराचा डाव! अंबपमधील शाळांमध्ये रंगला आगळावेगळा 'बाल बाजार

04:15 PM Mar 31, 2026 IST | NEETA POTDAR
hatkanangale   चिमुकल्या हातांनी मांडला व्यापाराचा डाव  अंबपमधील शाळांमध्ये रंगला आगळावेगळा  बाल बाजार
Advertisement

           मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत उत्साही आयोजन

Advertisement

हातकणंगले - श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप संचलित, प्राथमिक विद्यामंदिर अंबप, अंबप गर्ल्स हायस्कूल अंबप व अंबप हायस्कूल अंबप. येथे आज सोमवार दिनांक 30/03/2026 रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत “बाल बाजार” या उपक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले.

या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी विविध वस्तूंची खरेदी-विक्री करून व्यवहारज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या वस्तू तसेच विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले होते. या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबन, आत्मविश्वास आणि व्यावसायिक कौशल्यांचा विकास झाला.

Advertisement

कार्यक्रमास अंबप गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ दीप्ती विकासराव माने तसेच उपसरपंच असिफ मुल्ला सर्व ग्रामपंचायत सदस्य मुख्याध्यापक,शिक्षकवृंद तसेच पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे कौतुक केले.

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले

Advertisement
Tags :

.