For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जम्मू-काश्मीरच्या रियासीमध्ये दरीत कोसळली बस

06:29 AM Dec 26, 2023 IST | Tarun Bharat Portal
जम्मू काश्मीरच्या रियासीमध्ये दरीत कोसळली बस
Advertisement

वृत्तसंस्था/ जम्मू

Advertisement

जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात सोमवारी मोठी दुर्घटना घडली आहे. येथे लग्नाचे वऱ्हाड घेऊन चाललेली एक मिनीबस दरीत कोसळली आहे. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर 13 जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर गंभीर जखमींना मोठ्या रुग्णालयात हलविण्याची तयारी करण्यात आली आहे.

ही बस बलमतकोट येथून बदर गावाच्या दिशेने प्रवास करत होती. सोमवारी सकाळी सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास धामिणी येथे ही दुर्घटना घडली आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच त्वरित बचावकार्य सुरू करण्यात आले. मोहम्मद अशरफ नावाचा एक प्रवासी या दुर्घटनेत मृत्युमुखी पडला आहे. तर 3 ते 19 वर्षे वय असलेल्या 9 मुलींसमवेत 13 जणांना रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे. गंभीर जखमींमध्ये 17 वर्षीय ताहिर अहमदचा समावेश होता, राजौरी येथे त्याला नेण्यात येत असताना त्याने अखेरचा श्वास घेतला असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.