For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangli News : जतमधील दुधाळ वस्तीवरील घरफोडीचा छडा, एलसीबीकडून अल्पवयीन ताब्यात

05:46 PM Jan 06, 2026 IST | NEETA POTDAR
sangli news   जतमधील दुधाळ वस्तीवरील घरफोडीचा छडा  एलसीबीकडून अल्पवयीन ताब्यात
Advertisement

                     जतमध्ये मालमत्ता गुन्ह्यांवर एलसीबीचा धडाका

Advertisement

सांगली : जतमधील दुधाळ वस्तीवर घरफोडीचा छडा लावण्यात लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकास यश आले. एक लाख ७६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलास ताब्यात घेण्यात आल्याची माहिती एलसीबीचे निरीक्षक संजीव झाडे यांनी पत्रकारांना दिली.

घरफोडीसह मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिले आहेत. त्यानुसार एलसीबीचे निरीक्षक झाडे यांच्या नेतृत्वाखाली खास पथके तयार करण्यात आली आहेत.सहायक निरीक्षक पंकज पवार यांच्या नेतृत्वाखालील पथक जत परिसरात गस्तीवर होते. त्यावेळी दुधाळ वस्तीवर खलिल पैगंबर शेख यांच्या घरफोडी झाल्याचे समोर आले.त्यातील संशयित अल्पवयीन मुले असल्याची माहिती पथकास मिळाली.

Advertisement

पथकाने छापा टाकून दोघांनाही चा कशीसाठी ताब्यात घेतले. त्यांच्या पालकांसमोर त्यांनी कुलूप तोडून घरफोडी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून १९ ग्रॅमचे मंगळसूत्र, तीन ग्रॅमची अंगठी, तीन ग्रॅमचे सोन्याचे बेल, चार ग्रॅमची चेन अ-सा १ लाख ७६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदरचा गुन्हा जत पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आला.जत पोलिस अधिक तपास करत आहेत. या अल्पवयीनांनी आणखी काही गुन्हे केले आहेत, का याचाही शोध पोलीस घेत आहेत. त्यादृष्टीने तपास सुरू आहे.

कारवाईत सहायक निरीक्षक पं-कज पवार, बिराप्पा लातुरे, सोमनाथ गुंडे, संदीप नलावडे, अमर नरळे, नागेश खरात, सागर लवटे, अनिल कोळेकर, सागर टिंगरे, सतीश माने, अमिरशा फकीर, दरिबा बंडगर, मच्छिंद्र बर्डे, संदीप गुरव, उदय माळी, महादेव नागणे, केरबा चव्हाण, विक्रम खोत, अभिजीत पाटील यांचा सहभाग होता.

Advertisement
Tags :

.