सव्वा लाखाचे गंठण हिसडा टोळीकडून लंपास
सांगली :
एका हॉटेलच्या बाहेर दुचाकीवर उभ्या असण्राया एका महिलेच्या गळ्यातील 1 लाख 25 हजारचे मंगळसूत्र चोरट्याने हिसडा माऊन लंपास करुन पलायन केले. ही घटना रविवार दि. 1 रोजी रात्री साडे आठ च्या सुमारास शासकीय रुग्णालय रस्त्यावरील त्रिकोणी बागेच्यानजीक असण्राया रसोई हॉटेलच्या समोर घडली. याबाबत ऐश्वर्या आण्णासाहेब पाटील (रा. फ्लॅट नं. 13, रोटरी क्लब नजीक, महाराष्ट्र हौसिंग सोसायटी, क्रांती भेळनजीक, विश्रामबाग, सांगली) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
घटनेची मा†हती अशी, फिर्यादी ऐश्वर्या पाटील रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास इतर शिक्षकसमवेत जेवण करण्यासाठी त्रिकोणी बागेनजीक असण्राया हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी येवून दुचाकीवर थांबल्या होत्या. त्यावेळी पुष्कराज चौकाकडून दुचाकीवऊन एकजण फिर्यादी ऐश्वर्या पाटील यांच्या नजीक आला आा†ण काही कळायच्या आत चोरट्याने पाटील यांच्या गळ्यात असलेले 25 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र हिसडा माऊन लंपास केले. यावेळी पाटील यांना चोरट्याने धक्का मारल्याने पाटील रस्त्यावर पडल्या. पाटील आा†ण त्यांच्या मेत्रिणीनी आरडाओरडा केला. परंतु क्षणार्धात चोरट्याने मंगळसूत्र घेवून बसस्थानकाच्या दिशेने दुचाकीवरुन पलायन केले.