दोडामार्गात केळीच्या बुंद्यावरच उगवला घड
दोडामार्ग – वार्ताहर (छाया – समीर ठाकूर)
निसर्गात बऱ्याचदा अनेक वेगवेगळ्या काही गोष्टी घडलेल्या पाहावयास मिळतात. त्या पार्श्वभूमीवर केळीच्या बुंद्यावरच केळीचा थेट घड उगवण्याचा प्रकार दोडामार्ग शहरात घडला आहे.दोडामार्ग शहरातील आयी रोडवरील प्राथमिक शाळेच्या मागील बाजूस रहावयास असलेले व महावितरण मध्ये वायरमन म्हणून शहर परिसरात कार्यरत असलेल्या रोहन खडपकर यांच्या परसबागेत हा प्रकार पाहावयास मिळतो आहे. त्यांच्या परसबागेमध्ये अनेक छोटी मोठी झाडे, फुलझाडे तसेच केळीची पण झाडे आहेत. त्यातील एक केळीचे झाड हे बुंध्यापर्यंत छाटलेले होते. काही अंशी ते सुके होते. मात्र या छाटलेल्या भागाच्या ठिकाणी थेट केळीचा एक घडच उगवला आहे. खडपकर कुटुंबीय व आसपासच्या रहिवाशांसाठी हा एक अनोखा व सुखद धक्का आहे. श्री. खडपकर यांच्या परस बागेत अनेकजण भेट देऊन उगवलेल्या या घडाची पाहणी देखील करत आहेत.