For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दुसऱ्या सत्रात बाजारात तेजीची झुळूक

06:28 AM Aug 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
दुसऱ्या सत्रात बाजारात तेजीची झुळूक
Advertisement

स्मॉलकॅपचे समभाग चमकले : निफ्टी 25,000 वर स्थिरावली

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

भारतीय भांडवली बाजारात चालू आठवड्यातील दुसऱ्या सत्रात मंगळवारी सेक्सेक्स व निफ्टी यांचे निर्देशांकांने तेजीची झुळूक प्राप्त करत बंद झाले आहेत. यामध्ये दिग्गज कंपन्यांच्या मदतीने सेन्सेक्स दिवसअखेर 13.65 अंकांनी वधारुन 0.02 टक्क्यांसोबत निर्देशांक 81,711.76 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला 50 कंपन्यांसोबत 7.15 अंकांनी वधारुन निर्देशांक 0.03 टक्क्यांसोबत 25,017.75 वर बंद झाला आहे. तसेच निफ्टीने 25,000 ची पातळी स्थिर राखली आहे.

Advertisement

शेअर बाजारात तेजी प्राप्त करत दोन्ही निर्देशांक बंद झाले आहेत. कारण आर्थिक क्षेत्रातील समभागांच्या तेजीमुळे बाजारात काहीसे तेजीचे वातावरण राहिले. तसेच निफ्टीमधील आर्थिक सर्व्हिसमधील 0.82 टक्क्यांनीवधारुन  आणि निफ्टीतील बँक 0.26नी वधारल्याचे दिसून आले. मात्र एनर्जी आणि कझ्युंमरचे समभाग प्रभावीत होत बंद झाले आहेत.

व्यापक निर्देशांकामध्ये निफ्टी स्मॉलकॅप 100 निर्देशांकांने चांगली कामगिरी केली आहे. म्हणजे जवळपास 1.05 टक्क्यांनी वधारुनबंद झाला. दरम्यान मीडिया आणि आर्थिक सर्व्हिस कंपन्या 4.10 टक्क्यांनी तेजीत राहिले. तसेच एफएमसीजी, धातू, वाहन आणि कझ्युमर ड्यारेबल्स क्षेत्रांची कामगिरी घसरणीत राहिली.

निफ्टीमधील समभागांमधील 31 कंपन्यांमधील समभाग हे 2.04 टक्क्यांनी प्रभावीत राहिले. यामध्ये टायटन,हिंदुस्थान युनिलिव्हर, जेएसडब्लू स्टील, कोल इंडिया आणि ग्रासिम हे सर्वाधिक घसरणीच्या कंपनीत राहिले. तर सेन्सेक्समधील 30 समभागांमधील 19 समभाग हे घसरणीसह बंद झाले.

वधारलेल्या कंपन्यांमध्ये निफ्टीत बजाज फिनसर्व्ह, एसबीआय लाईफ, मारुती सुझुकी एचडीएफएल लाईफ आणि लार्सन अॅण्ड टुब्रो यांचे समभाग सर्वाधिक वधारणाऱ्या कंपन्यांमध्ये राहिले. तर बीएसईमधील कंपन्यांमध्ये बजाज फिनसर्व्ह, मारुती सुझुकी, लार्सन अॅण्ड टुब्रो , बजाज फायनान्स व इन्फोसिस हे पहिल्या पाचमध्ये तेजीत राहिले.  अन्य कंपन्यांमध्ये सनफार्मा, अॅक्सिस बँक, भारती एअरटेल व नेस्ले इंडिया यांचे समभाग राहिले आहेत.

Advertisement
Tags :

.