उत्खननात सापडला कांस्याचा मुखवटा
चीनचा सिचुआन प्रांत स्वत:चे हिरवेगार डोंगर आणि नद्यांमुळे ओळखला जातो. चेंगडू शहरात काही मजूर नदीकाठावर खोदकाम करत असताना अनोखा शोध लागला आहे. खोदकामादरम्यान कांस्याचा मुखवट हाती लागली आहे. या मुखवट्याचे डोळे मोठे होते आणि टोकदार कान तसेच रुंद तोंड होते. मुखवटा दिसून येताच येथे पुरातत्वतज्ञांना पाचारण करण्यात आले. यानंतर आसपासच्या भागात उत्खनन सुरू केले असता इतिहासच बदलून गेला. हे ठिकाण संक्सिंगडुई म्हणजेच प्राचीन शू साम्राज्याची राजधानी असल्याचे स्पष्ट झाले. या उत्खननात 200 हून अधिक झेड शस्त्रास्त्रs, 60 हून अधिक हस्तिदंत, जाळण्यात आलेल्या प्राण्यांची हाडं आणि मोठे ब्रॉन्ज मास्क आणि हेड्स मिळाले आहेत. हे मास्क इतके विचित्र होते, की तज्ञांनी याला ‘जगातील नववे आश्चर्य’ असे नाव दिले. यातील सर्वात मोठा मास्क 1.32 मीटर रुंद आणि 0.72 मीटर उंच होता. या मास्कला माणूस परिधान करू शकत नव्हता. याचे डोळे 16.5 सेंटीमीटर बाहेर, त्रिकोणाकृती बुब्बुळं आणि पंखासारखे कान होते. हा मास्क एलियनचा वाटत होता. हा मास्क प्राचीन शू लोकांचा धार्मिक प्रतीक होता, मास्कांना लाकडाच्या टोटेमवर चढविले जायचे. काहींवर सोन्याचे आच्छादन आहे. याचे वजन 280 ग्रॅम होते. एकूण 8 ख•dयांमधून 13 हजारांहून अधिक कलाकृती मिळाल्या होत्या.
रहस्यमय ठरला शोध
या उत्खननात ब्रॉन्ज ट्री ऑफ लाइफ (4 मीटर उंच), साप-ड्रॅगनच्या आकृत्या, झेड ब्लेड्स आणि सिल्कच्या खुणा मिळाल्या. सर्वकाही तुटलेले-फुटलेले आणि जाळलेले होते, जणू विधी म्हणून त्यांचा बळी दिला गेला असावा. कार्बन डेटिंगद्वारे हे ख्रिस्तपूर्व 1600-1046 काळातील असल्याचे स्पष्ट झाले, म्हणजेच 3000-3600 वर्षांपूर्वीचे. शू साम्राज्य येलो रिव्हर व्हॅलीपासुन वेगळे होते. याची कुठलीच लेखी नोंद नव्हती, परंतु ब्रॉन्झ कास्टिग तंत्रज्ञान इतके प्रगत होते की शियानच्या टेराकोटा आर्मीपेक्षा चांगले होते. 2020-22 मध्ये नव्या उत्खननातून आणखी 6 ख•dयांमध्ये 500 हून अधिक रेलिक्स मिळाले. गोल्ड मास्कचे तुकडे, आयव्हरी कार्विंग्स, ब्रॉन्झ अॅनिमल्सने सर्वांना चकित केले. एक हायब्रिड टायगर-ड्रॅगन फिगर मिळाला ,ज्याच्यावर काळा रंग होता. शू साम्राज्य अचानक गायब कसे झाले याचे रहस्य कायम आहे. ख्रिस्तपूर्व 800 पर्यंत हे शहर बहरले, मग जिंशा साइटमध्ये शिफ्ट झाले. कारण बहुधा पूर किंवा युद्ध राहिले असावे. या शोधामुळे चिनी इतिहासाचे पुनर्लेखन करावे लागले आहे. पूर्वी संस्कृती केवळ येलो रिव्हरवर होती असे मानले जायचे, परंतु संक्सिंगडुईने यांगत्जे खोरेही प्रगत होते, असे दाखवून दिले. आता हे ठिकाण युनेस्कोच्या टेंटेटिव्ह यादीत आहे.