फुटलेल्याला फुलदाणीला मोठी किंमत
ब्रिटनमध्ये एका इसमाला स्वत:च्या जुन्या घराच्या बगिच्यात एक फुटलेली अत्यंत जुनी फुलदाणी सापडली, त्याने याबाबत एका लिलाव घराच्या संचालकाशी संपर्क साधत त्याच्या वैशिष्ट्यांविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला, यानंतर फुलदाणीचे महत्त्व कळल्यावर त्याचा मालक आणि अन्य काही लोकांना धक्काच बसला.
ब्रिटनच्या एका बगिच्यात अनेक दशकांपासून पडून असलेल्या आणि तुटलेल्या फुलदाणीला लिलावात 56 लाख रुपयांची किंमत मिळाली आहे. ही फुलदाणी 19 व्या शतकातील एका अग्रगण्य कलाकाराची विस्मृतीत गेलेली कलाकृती होती.
लंडन येथील चिसविक लिलावघराच्या डिझाइन प्रमुख मॅक्सिन विनिंग यांनी या तुटलेल्या फुलदाणीचा याची किंमत इतकी अधिक असेल याची कल्पना नव्हती असे सांगितले आहे. चिसविक लिलावघरानेच या फुलदाणीचा लिलाव केला आहे.
प्रसिद्ध कलाकाराकडून निर्मिती
दगडाने निर्मित ही उत्कृष्ट कलाकृती 1964 मध्ये हॅन्स कोपर नावाच्या एका प्रसिद्ध सिरॅमिक कलाकाराकडून निर्माण करण्यात आली होती. हॅन्स कोपर हा 1939 मध्ये जर्मनीतून येत ब्रिटनमध्ये स्थायिक झाला होता, चार फूटांच्या उंचीवर उभी ही कलाकृती त्याच्याकडून निर्माण करण्यात आलेलया सर्वात उंच सिरॅमिक कलाकृतींपैकी एक होती.
एका महिलेकडून खरेदी
ही कलाकृती एका महिला ग्राहकाकडून निर्माण करविण्यात आली होती, या महिलेने या फुलदाणीला अत्यंत सांभाळून ठेवले होते. अनेक वर्षांपर्यंत ही फुलदाणी तिच्याकडेच होती. परंतु एकदा ही फुलदाणी पडून फुटली, तिने याला फेकून देण्याऐवजी कशाप्रकारे तरी जोडले आणि मग स्वत:च्या लंडन येथील घरामागील बगिच्यात एक सजावटी फूलपात्र म्हणून ठेवले होते.
रोपं लावण्यासाठी वापर
महिलेच्या निधनानंतर तिच्या नातवंडांना तिच्या घरातील सर्व गोष्टी वारशादाखल मिळाल्या. यात बगिच्यात फेकयणत आलेली फुलदाणी देखी लसामील होती. महिलेच्या नातवाला ही कलाकृती पसंत पडली, याचमुळे त्याने याच्या मूल्यांकनासाठी चिसविक लिलावघराशी संपर्क साधला. लिलावघराचे तज्ञ जो लॉयड यांनी फुलदाणी दोन वेगवेगळ्या हिस्स्यांमध्ये असल्याचे आणि त्यात रोपांची लागवड केली जात असल्याचे पाहिले. याचा वरील हिस्सा गायब असला तरीही ही स्वत:च्या शैलीत अत्यंत विशिष्ट होती, तर खालील हिस्स्यावर अद्याप कॉपरची मोहर लावलेली होती.
सर्वाधिक बोली
याच्या नुकसानीच्या स्थितीमुळे लिलाव घराने मूळ स्वरुपात या फुलदाणीची किंमत 7900 ते 13233 डॉलर्सदरम्यान ठरविली होती. परंतु फुलदाणीबद्दल उत्सुकता वाढल्याने याला अधिक किंमत मिळाली. एका अमेरिकन व्यक्तीने याकरता 48,310 डॉलर्स खर्च केले आहेत. शुल्क विचारात घेत एकूण खर्च करण्यात आलेली रक्कम 66 हजार डॉलर्सपेक्षा अधिक होती, या फुलदाणीला मूळचे स्वरुप प्राप्त करून देण्यासाठी सुमारे 10500 डॉलर्स खर्च करावे लागणार आहेत. या फुलदाणीला इतकी किंमत मिळेल अशी अपेक्षा विक्रेत्याला नव्हती असे विनिंग यांनी सांगितले आहे.