For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आठवड्याच्या शेवटच्या दिवशी बाजारात तेजीची झुळूक

07:00 AM Aug 22, 2026 IST | Tarun Bharat Portal
आठवड्याच्या शेवटच्या दिवशी बाजारात तेजीची झुळूक
Advertisement

सेन्सेक्स 3 तर निफ्टी 20अंकांनी वधारला : कच्च्या तेलासह रुपयाच्या हालचालीचा परिणाम

Advertisement

वृत्तसंस्था/मुंबई

भारतीय भांडवली बाजारात चालू आठवड्यातील अंतिम सत्रात शुक्रवारी सेन्सेक्स आणि निफ्टी यांचे निर्देशांक काहीसे तेजीसह वाढून बंद झाले आहेत.   बाजारातील सुस्तीतही धातू क्षेत्राचे स्टॉक्स चमकले. याशिवाय, बँकिंग आणि रिअल्टी शेअर्सनीही तेजी दाखवली आहे. मुख्य कंपनीच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेरीस 3.11 अंकांनी वधारुन निर्देशांक 77,540.83 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेरीस 20.15 अंकांच्या तेजीसह निर्देशांक 24,252.00 वर बंद झाला आहे. सलग दुसऱ्या आठवड्यात बाजार घसरणीसह बंद झाला. तेलाच्या वाढलेल्या किमती, अमेरिका-इराण चर्चा रखडणे आणि अमेरिकन बाँड यील्डमध्ये वाढ यामुळे बाजारावर दबाव आला.

Advertisement

दरम्यान निफ्टी 50 मध्ये, श्रीराम फायनान्सचे शेअर्स 2-2.5 टक्क्यांनी मजबूत राहिले, जे सर्वाधिक वाढलेले शेअर्स होते. कोटक बँक, आयटीसी आणि बजाज फायनान्सच्या शेअर्समध्ये प्रत्येकी 1 टक्क्यांहून अधिक वाढ सुरूच राहिली. तर टाटा कंझ्युमर 1.1 टक्क्यांच्या घसरणीसह सर्वाधिक तोटा सहन करणारा शेअर ठरला. निफ्टी 50 मधील सर्वाधिक घसरण झालेल्या कंपन्यांमध्ये मारुती सुझुकी, ट्रेंट, एचसीएल टेक, इंडिगो आणि ओएनजीसी यांचा समावेश आहे. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये एफएमसीजी क्षेत्रात सर्वात मोठी घसरण दिसून आली, निफ्टी एफएमसीजी 0.74 टक्क्यांनी घसरून बंद झाला.

बाजारात सुस्ती राहण्याचे कारण काय?

पीएल कॅपिटल या ब्रोकिंग फर्मचे चीफ बिझनेस ऑफिसर (डीलिंग अँड अॅडव्हायझरी) विक्रम कसात म्हणाले की, दिवसभर बाजार एका मर्यादित कक्षेत व्यवहार करत होता. निवडक शेअर्समधील खरेदीमुळे किंचित सकारात्मक कल दिसून आला. परंतु जागतिक भावनांचा परिणाम आयटी स्टॉक्सवर दिसून आला, ज्यामुळे त्यांच्यावर दबाव आला. महागडे कच्चे तेल, मध्य पूर्वेतील सुरू असलेला तणाव आणि जागतिक बॉण्ड बाजारातील हालचाली यांसारख्या घटकांमुळे बाजारावर दबाव येत आहे. या ट्रेडिंग सत्रात फायनान्शियल्स, मेटल्स आणि स्मॉलकॅप्समध्ये खरेदी सुरूच राहिल्याचा परिणामही झाल्याचे दिसून आले.

  • पॉवरग्रिड कॉर्प            272
  • भारत इले.                 413
  • कोटक महिंद्रा            402
  • एनटीपीसी                 340
  • बजाज फिनसर्व्ह       2028
  • एशियन पेन्ट्स           2640
  • आयसीआयसीआय     1419
  • लार्सन अॅण्ड टुब्रो     4088
  • टायटन                     5080
  • टीसीएस                  2298
  • अदानी पोर्ट             1697
  • भारती एअरटेल        1944
  • एचडीएफसी बँक      729
  • एयू स्मॉल फायनान्स 1105
  • फेडरल बँक             360
  • अंबुजा सिमेंट            414
  • हिंडाल्को                  1037
  • बँक ऑफ बडोदा       246
  • एसबीआय लाईफ      1795

  • ट्रेन्ट                        2922
  • मारुती सुझुकी        13580
  • इंटरग्लोब एव्ही.       5092
  • एचसीएल टेक        1304
  • हिंदुस्थान युनि         2017
  • इन्फोसिस              1120
  • महिंद्रा-महिंद्रा         3417
  • टेक महिंद्रा             1583
  • आयटीसी                269
  • अल्ट्राटेक सिमेंट     11551
  • टाटा स्टील               182
  • अॅक्सिस बँक         1246
  • स्टेट बँक                 1045
  • बजाज फायनान्स     1093
  • रिलायन्स इंडस्ट्रीज   1314
  • सनफार्मा               1900
  • ब्रिटानिया              5364
  • श्री सिमेंट             24181
  • सिप्ला                1426
  • अपोलो हॉस्पिटल 8659
  • आयशर मोर्ट्स 8001
  • हॅवेल्स इंडिया 1265
Advertisement
Tags :

.