वेलींनी तयार झालेला पूल
800 वर्षांपासून अस्तित्वात
जपानची प्रतिमा एक पुढारलेला देश अशी आहे. जपानमध्ये शिकोकू बेटावर इया खोरे आहे. हा भाग अत्यंत शांत असून समुराई योद्धा लपण्यासाठी याचा वापर करायचे. इया खोऱ्यात समुराई लोकांचे अस्तित्व खूप आधीच समाप्त झाले आहे. त्यांची जागा आता अधिक स्वागतयोग्य सुविधा स्टोअर आणि पर्यटक माहिती केंद्रांनी घेतली आहे. तरीही क्षेत्रात जीवन किती प्रतिकूल असू शकते हे सांगणाऱ्या येथे अनेक गोष्टी आहेत. इया घोऱ्याच्या काही हिस्स्यांमध्ये अत्यंत वळणदार नदीमुळे स्थानिक लोकांना सहजपणे ये-जा करता यावी म्हणून वेलींच्या मदतीने अनेक तात्पुरते पूल निर्माण करण्यात आले होते. प्रतिस्पर्धी जेनजी समुदायाच्या विरोधातील स्वत:च्या पराभवानंतर हेइके समुदायाच्या सदस्यांकडून हा पूल तयार करण्यात आला होता. हा पूल रक्षणाचा एक मार्ग होता, कारण शत्रूकडून तो ओलांडण्याचा प्रयत्न झाल्यास सहजपणे तो तोडणे शक्य होते. जवळपास 800 वर्षे उलटली असून तेव्हापासून अनेक पूल अस्तित्वहीन झाले आहेत, परंतु इया कजुराबाशी हा पूल पर्यटकांचे आकर्षक ठरला आहे.
45 मीटर लांबीचा हा पूल ओलांडणे तितके सोपे नाही. वेलींनी तयार झालेला असल्याने लोक यावरून चालू लागल्यावर तो हलू लागतो. यामुळे लोकांमध्ये भीती निर्माण होते. मागील 800 वर्षांमध्ये पूलाचे डिझाइन काही प्रमाणात बदलल्याचे मानले जाते. आता या पूलाला स्टीलच्या तारांचे कवच पुलविण्यात आले आहे. वेलींद्वारे खालून वाहणारी नदी दिसत नाही. हा पूल ओलांडताना आजुबाजूच्या दृश्याचा आनंद घेता येत नाही, कारण अन्यथा तुमचे लक्ष विचलित होऊन खाली कोसळण्याची भीती असते.