भरतीलाच ब्रेक, रिक्त पदे भरणार कशी?
कोल्हापूर :
एसटी प्रशासनाने नोकर भरती प्रक्रिया बंद केली आहे. त्यामुळे रिक्त पदे भरता येत नाही. कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर नवीन कर्मचारी घेतले गेले नसल्याने रिक्त पदांची संख्यांमध्ये वाढच होत आहे. कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे. अपुऱ्या स्टापमुळे रोज सुमारे 400 चालकांना डब्बल ड्यूटी करण्याची वेळ येत आहे. अशीच स्थिती एसटीच्या इतर विभागामध्येही आहे.
गेल्या 16 वर्षापासून एसटी सेवा तोट्यात होती. यामुळे रिक्त पदे असतानाही नवीन भरती प्रक्रिया बंद केली आहे. यामुळे कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर रिक्त जागेवर तातडीने भरती होऊ शकली नाही. काही ठिकाणी आऊटसोसिंगने पदे भरली गेली. परंतू त्यास मर्यादा असल्याने अपुऱ्या कर्मचाऱ्यांचा प्रश्न कायमच राहिला आहे.
महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर महिला महिला सन्मान योजना, अमृत ज्येष्ठ नागरीक योजना सुरू केल्याने तोट्यात असणारी एसटी फायदात येऊ लागली आहे. प्रवाशी संख्या वाढल्याने सहाजिक सेवाही चांगली देण्याची जबाबदारी एसटीवर आहे. परंतू अपुरा स्टापमध्ये चांगली सेवा देणे शक्य होत नाही. जर एसटी तोट्यातून बाहेर पडली आहे. तर थांबवलेली भरती प्रक्रिया पुन्हा सुरू करणे आवश्यक आहे.
सध्या एसटीमध्ये 5156 पदे मंजूर आहेत. त्यापैकी 1944 रिक्त पदे आहेत. यामध्ये 1936 चालकांची कायम पदे मंजूर असताना 1259 चालक कार्यरत आहेत. 677 पदे रिक्त आहेत. याचबरोबर कायम वाहक 1525 मंजूर असताना 1321 कार्यरत असून 572 पदे रिक्त आहे. अशीच स्थिती प्रशासन, कार्यशाळा आणि कंत्राटी वाहकांमध्येही आहे. परिणामी कार्यरत कर्मचाऱ्यांना जादा काम करण्याची वेळ येत आहे. 400 चालकांना डब्बल ड्यूटी करावी लागत आहे. बसमधील प्रवाशांचा जीव ज्यांच्यावर आवलंबून आहे, अशा किमान चालकांची तरी रिक्त पदे तत्काळ भरणे आवश्यक आहे. डब्बल ड्यूटीमुळे चालकांवर ताण येत आहे. मोठी दुर्घटना घडण्यापूवीं प्रशासनाने यावर निर्णय घेणे आवश्यक आहे.