परतीच्या पावसाचा मारा ; बळीराजा चिंतेत सारा
बहुतांश शेती पाण्याखाली ; शेतीच्या कामांना ब्रेक
प्रतिनिधी
बांदा
सावंतवाडी तालुक्यात गेले काही दिवस परतीचा पाऊस मुसळधार सुरू आहे मेघगर्जना आणि विजांच्या गडगडाटासह आलेल्या या पावसाने शेतीच्या कामाला ब्रेक लावला आहे. कापणी योग्य झालेली भातशेती पाण्याखाली गेली तर काही प्रमाणात कापलेली भातशेतीचे व गवताचे प्रचंड नुकसान झाले आहे. असाच जर पाऊस सुरू राहिल्यास उभ्या व कापलेल्या भाताला कोंब येऊन कुजण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे.गेले काही दिवस परतीचा पाऊस मुसळधार कोसळत आहेत. ठिकठिकाणी भातशेती कापण्यायोग्य झाली असून पावसाने विश्रांती घेतल्यास शेतकऱ्यांना आपले पीक पदरात टाकून घेता येईल. काही ठिकाणी भात पीक कापणी योग्य झाल्याने शेतकऱ्यांनी कापणीला सुरुवात केली होती मात्र पावसाने परत सुरुवात बकेल्याने कापणीच्या कामाला ब्रेक लागला आहे. तर कापून ठेवलेले भात आणि कापून ठेवलेले गवत पावसामुळे भिजून गेले आहे. परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांनी कापणी करून त्याच ठिकाणी भात मारून पीक पदरात घेण्यात बळीराजा व्यस्त आहे.अश्याच पद्धतीने जर पाऊस सुरू राहिल्यास शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावू शकते.