For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पहिल्यांदाच पेटीएमकडून बोनस?

06:05 AM Jul 18, 2026 IST | Tarun Bharat Portal
पहिल्यांदाच पेटीएमकडून बोनस
Advertisement

मुंबई : डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म पेटीएमची सहकारी कंपनी वन 97 कम्युनिकेशन्स आपल्या 25 वर्षाच्या इतिहासात प्रथमच समभागधारकांना बोनस देण्याची तयारी करत असल्याची माहिती आहे. लक्षात घ्या की कंपनीने पूर्ण वर्षात पहिल्यांदाच नफा प्राप्त केला आहे. सोबत कंपनीने पेमेंट व फायनॅन्शीयल सेवेतली बाजारातील हिस्सेदारीही चांगलीच वाढवली आहे.

Advertisement

कंपनी बोनस देणार या बातमीने कंपनीचा समभाग गुरुवारी 2 टक्के इतका वाढला होता. बोनस देण्यासंदर्भातील निर्णय हा 20 जुलै रोजी होणाऱ्या बैठकीत घेतला जाणार आहे. बोनसचा प्रस्ताव अशावेळी आला आहे जेव्हा आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये कंपनीने 552 कोटी रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त केला आहे. एका वर्षापूर्वी कंपनीने 663 कोटी रुपयांचा तोटा सहन केला होता. कंपनीचा कामकाजी नफा 1506 कोटी नुकसानीत होता तर यंदा तो 502 कोटी रुपये नफ्यात बदलला आहे. आपली मजबूत आर्थिक स्थिती आणि भविष्यातील विकास संधींबाबत विश्वास व्यक्त करण्यासाठी कंपनी बोनस समभाग जारी करत असतात.

छोट्या गुंतवणूकदारांसाठी..

Advertisement

पेटीएमचे समभाग दीर्घकाळापासून 1 हजार रुपयांवर व्यवहार करत आहे. जुलै महिन्यात तर या समभागाने 52 आठवड्यानंतर उच्चांकी स्तर गाठला होता. बोनस समभाग जारी केल्यानंतर समभागाची किमत अॅडजस्ट होईल ज्याने छोट्या व नव्या गुंतवणूकदारांना जादा लाभ होणार आहे. याने कंपनीच्या समभागधारकांमध्ये वाढ होणार आहे.

Advertisement
Tags :

.