महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

लढाऊ विमानातून कोसळली बॉम्बसदृश वस्तू

06:05 AM Aug 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मोठा स्फोट : पोखरण फायरिंग रेंजमध्ये 8 फूट खोल खड्डा, हवाई दलाकडून तपासाचे आदेश

Advertisement

वृत्तसंस्था/ जैसलमेर

Advertisement

राजस्थानमधील जैसलमेरच्या रामदेवरा भागात बुधवारी, 21 ऑगस्ट रोजी हवाई दलाच्या लढाऊ विमानातून बॉम्बसदृश वस्तू पडल्याने मोठा स्फोट झाला. पोखरण फील्ड फायरिंग रेंजमध्ये 8 फूट खोल खड्डा, तयार झाला आहे. बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी हवाई दलाकडून तपासाचे आदेश देण्यात आले आहेत. पोखरण येथील आर्मी रेंजपासून 15 किलोमीटर अंतरावर ही घटना घडली.

लढाऊ विमानातून बॉम्बसदृश वस्तू कोसळल्यामुळे पोखरण फायरिंग रेंजमध्ये 8 फूट खोल ख•ा तयार झाला आहे. पोखरण फील्ड फायरिंग रेंजमध्ये  लोकवस्तीपासून दूर असलेल्या निर्जन भागात ही घटना घडली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, पोलीस अलर्ट मोडमध्ये असल्याचे पोखरणचे एएसपी गोपाल सिंह भाटी यांनी सांगितले.

बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास स्फोटाची घटना घडली. गावातून खूप कमी उंचीवर एक विमान उडत होते. याचदरम्यान, गावातील लोकवस्तीपासून एक किलोमीटर अंतरावर मोठा स्फोट झाला. स्फोटाचा आवाज ऐकून गावातील लोक घटनास्थळी पोहोचले, असे राठोडा गावातील खिव सिंह यांनी सांगितले. या घटनेविषयी पोलिसांना माहिती दिल्यानंतर रामदेवरा पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी लष्कर, बीएसएफ आणि इतर सुरक्षा एजन्सीच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली आहे.

भारतीय हवाई दलाने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. पोखरण फायरिंग रेंजजवळ तांत्रिक बिघाडामुळे भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानातून एक एअर स्टोअर अनवधानाने बाहेर पडले. या घटनेची चौकशी करण्यासाठी भारतीय हवाई दलाला चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. यात कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.’ असे सांगण्यात आले.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article