महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

पेटीएमला झटका ; सॉफ्टबँकेने 2 टक्क्यांहून अधिकचा हिस्सा काढून घेतला

07:00 AM Mar 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

समभाग जवळपास 4 टक्क्यांनी नुकसानीत 

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

Advertisement

आधीच संकटाचा सामना करत असलेल्या भारतीय फिनटेक युनिकॉर्न पेटीएमला आणखी एक धक्का बसला आहे. जपानमधील आघाडीची गुंतवणूक कंपनी सॉफ्टबँक ग्रुप कॉर्पोरेशनने पेटीएममधील आपली काही हिस्सेदारी काढून घेतली आहे. रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, सॉफ्टबँकने पेटीएममधील 2.17 टक्के वाटा काढून घेतला आहे. गुरुवारी दाखल झालेल्या एक्सचेंज फाइलिंगमध्ये स्टेक कपातीची माहिती देण्यात आली आहे. या बातमीनंतर पेटीएमचे समभाग हे 4 टक्क्यांहून अधिक घसरले. सध्या पेटीएमची मूळ कंपनी वन 97 कम्युनिकेशनचे समभाग हे 4.38 टक्क्यांनी घसरून 388.40 रुपयांवर व्यवहार करत आहेत.

गुंतवणूकदारांचा पेटीएमवरील विश्वास कमी होत आहे का?

सप्टेंबर 2022 पर्यंत पेटीएममध्ये सॉफ्टबँक समूहाचा 17.5 टक्के हिस्सा होता, जो आता भारतीय पेमेंट स्टार्टअपमधील 5.01 टक्क्यांवरून केवळ 2.83 टक्के झाला आहे. भागभांडवलातील ही कपात एक वर्षाहून अधिक काळ सुरू आहे. याआधी जानेवारीमध्येही समूहाने फिनटेक जायंटमधील आपली हिस्सेदारी सोडली होती. वॉरेन बफेटच्या बर्कशायर हॅथवे आणि चीनच्या अलीबाबा समूहासारख्या काही जागतिक गुंतवणूकदारांनी 2023 मध्ये पेटीएममधील त्यांचा हिस्सा काढून घेतला होता, तर चीनच्या फिनटेक फर्म अँट फायनान्शिअलच्या नेदरलँड-आधारित युनिटसह इतर कंपन्यांनी देखील पेटीएममधील त्यांचा हिस्सा कमी केला होता.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article