महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

बृजभूषण शरण सिंह यांना झटका

06:13 AM Apr 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

उमेदवारी संकटात : भाजपच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

उत्तरप्रदेशच्या कैसरगंजचे भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांना महिला कुस्तीपटूंच्या कथित लैंगिक शोषणाच्या आरोपांप्रकरणी झटका बसला आहे. दिल्लीच्या न्यायालयाने बृजभूषण यांच्याकडून दाखल याचिका फेटाळली आहे. या याचिकेद्वारे बृजभूषण यांनी स्वत:वरील सर्व आरोपांप्रकरणी पुन्हा चौकशी केली जावी अशी मागणी केली होती. बृजभूषण यांची ही याचिका फेटाळण्यात आल्याने त्यांच्याविरोधात लैंगिक शोषणाप्रकरणी आरोप निश्चित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

न्यायालयाच्या या निर्णयामुळे बृजभूषण यांच्या राजकीय अपेक्षांनाही मोठा धक्का बसला आहे. बृजभूषण यांच्यावरील कायदेशीर कारवाईचा मुद्दा कायम राहिल्यास त्यांनी निवडणूक लढवू नये. स्वत:ऐवजी कुटुंबातील एखादा सदस्य किंवा पत्नी किंवा पुत्राला संधी द्यावी असे भाजपचे म्हणणे आहे.

बृजभूषण यांना भाजपकडून उमेदवारी नाकारली जाणार असल्याचे मानले जात आहे. बृजभूषण यांच्याकडूनच यासंबंधीचे संकेत मिळाले आहेत. भगवान रामाची इच्छा असेल तेच घडेल असे त्यांनी म्हटले होते. बृजभूषण हे स्वत:च्या कुटुंबातील सदस्याला निवडणूक लढविण्याची संधी देण्यास तयार असल्याचे मानण्यात येत आहे.

दिल्लीतील राउज अॅव्हेन्यू न्यायालयाच्या न्यायाधीश प्रियांका राजपूत यांनी बृजभूषण यांच्यावरील आरोपनिश्चितीचा निर्णय 7 मे रोजी होणार असल्याचे म्हटले आहे. बृजभूषण यांनी स्वत:वर झालेले लैंगिक शोषणाचे आरोप फेटाळून लावले आहेत. ज्यादिवशी महिला कुस्तीपटूसोबत कथित छेडछाड झाली होती, त्यादिवशी आपण दिल्लीत नव्हतो असा दावा बृजभूषण यांनी केला आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article