सोलापूरहून सांगलीला येताना काळाचा घाला; शिरढोण हद्दीत दुचाकी दुभाजकाला धडकली ;३१ वर्षीय तरुण जागीच ठार
रत्नागिरी-नागपूर महामार्गावर भीषण अपघात
कवठेमहांकाळ -रत्नागिरी-नागपूर महामार्गावर शिरढोण (ता. कवठेमहांकाळ) गावच्या हद्दीत दुचाकी दुभाजकाला धडकून झालेल्या भीषण अपघातात सांगली येथील ३१ वर्षीय युवक जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी १० रोजी दुपारी घडली. महेश शारदा शिंदे (वय ३१, रा. दसरे चौक, सांगली) असे ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.महेश शिंदे हा मंगळवारी दुपारी सोलापूरहून सांगलीकडे दुचाकीवरून (क्र. एपी ४० ईपी-५९०२) येत होता. रत्नागिरी-नागपूर
महामार्गावरीलशिरढोण गावच्या हद्दीत असलेल्या हॉटेल जेजे समोर आला असताना दुचाकी अचानक रस्त्यावरील दुभाजकाला जोरात धडकली.या धडकेत ते गंभीर जखमी झाला. अपघाताची तीव्रता इतकी होती की, त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली. दरम्यान, मृत युवकाच्या नातेवाईकांशी वेळेवर संपर्क साधता न आल्याने मंगळवारी रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.