For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राजापुरात फासकीत अडकलेल्या ब्लॅक पँथरला जीवदान

01:00 PM Jun 27, 2024 IST | Abhijeet Khandekar
राजापुरात फासकीत अडकलेल्या ब्लॅक पँथरला जीवदान
black panther
Advertisement

राजापूर वार्ताहर

तालुक्यातील कुवेशी येथील कुवेशी येथे हर्षद मांजरेकर यांच्या आंबा कलम बागेच्या कंपाऊंडला लावलेल्या तारेच्या फासकीत अडकलेल्या ब्लॅक पँथरला (काळा बिबट्या) वनविभागाने सुरक्षितरित्या पिंजऱयामध्ये पकडून नैसर्गिक अधिवासात मुक्त केले आहे. ब्लॅक पँथरला पाहण्यासाठी परिसरात ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.

Advertisement

याबाबत वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, काळा बिबट्या (ब्लॅक पँथर) अडकल्याची माहिती पद्मनाथ उर्प पिंट्या कोठारकार यांनी परिमंडळ वन अधिकारी राजापूर यांना दूरध्वनीवरून दिली. त्यानंतर राजापूर वनपाल यांच्यासह वनविभागाचे कर्मचारी व रेस्क्यू टीमने घटनास्थळी जात तारेच्या फासकीत अडकलेल्या बिबट्याला फासकीतून मुक्त करून सुस्थितीत पिंजऱ्यामध्ये घेतले.

Advertisement
Advertisement
Tags :

.