महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

मस्क यांच्या जीवनावर लवकरच बायोपिक

06:33 AM Nov 14, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

न्यूयॉर्कचा फिल्म स्टुडिओ ए 24 यांची निर्मिती करणार आहे

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisement

टेस्लाचे सीईओ आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांच्या जीवनावर बायोपिक बनवण्यात येणार आहे. ‘ब्लॅक स्वान’ दिग्दर्शक आणि ऑस्कर नामांकित डॅरेन अॅरोनोफस्की या बायोपिकचे दिग्दर्शन करणार आहेत. न्यूयॉर्कच्या फिल्म स्टुडिओ ए24 ने बायोपिक बनवण्याचे अधिकार प्राप्त केले आहेत.

ए24 स्टुडिओने यापूर्वी ‘द व्हेल’साठी अरोनोफस्कीसोबत काम केले होते. या चित्रपटात ब्रेंडन फ्रेझरने मुख्य भूमिका साकारली होती. मस्कनेही त्यावर बायोपिक बनवणार असल्याची पुष्टी केली आहे. त्याने लिहिले- आनंद झाला, डॅरेन हा बायोपिक करत आहे, तो सर्वोत्तम दिग्दर्शकांपैकी एक आहे.

एलॉन मस्क यांचे चरित्र सप्टेंबरमध्ये समोर आले लेखक

वॉल्टर आयझॅकसन यांनी या वर्षी सप्टेंबरमध्ये एलॉन मस्क यांच्या जीवनावर चरित्र लिहिले आहे. आता याच चरित्रावर आधारित हा बायोपिक बनवला जाणार आहे. यापूर्वी 2015 मध्ये अॅपलचे सह-संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांच्यावरील आयझॅकसनच्या पुस्तकावर एक चित्रपट बनवण्यात आला होता. यामध्ये आयरिश अभिनेता मायकल फासबेंडरने स्टीव्ह जॉब्सची भूमिका साकारली होती.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article