पालगडमध्ये अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू
दापोली
तालुक्यातील पालगडमध्ये पुणे येथील चारचाकी गाडीने दुचाकीला धडक दिल्याने स्वाराचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली.
दापोली पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, पालगड ब्राम्हणवाडी येथील विकास नरहर काळे (६३) हे पालगड पूज्य साने गुरुजी पतसंस्थेचे पिग्मी गोळा करण्याचे काम करतात. रविवारी सकाळी १०.३० च्या सुमारास काळे आपल्या ताब्यातील दुचाकीने (क्र. श्प्-0८Aश्-२८९२) पालगड-मंडणगडच्या दिशेला जात असताना दापोलीहून मंडणगडकडे येणाऱ्या चारचाकी गाडीने (क्र. श्प्-१२-Xण्-०३३०) मागून येवून शिरखल पूल येथे ठोकर दिली.
या अपघातात विकास नरहर काळे हे गंभीर जखमी झाले. काळे यांना पालगड येथील खासगी दवाखान्यात नेले असता तेथील डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय दापोली येथे घेवून जाण्यास सांगितले. यानंतर उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी काळे यांना तपासून मृत घोषित केले. या अपघात प्रकरणी चारचाकी वाहनचालक तन्मय सुनील जगताप (रा. पुणे) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मिलिंद चव्हाण करीत आहेत.