कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पाकिस्तानच्या गळ्यात मोठा फास

06:01 AM May 06, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अफगाणिस्तान माजी उपाध्यक्षांनी साधला निशाणा

Advertisement

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानचे संबंध सातत्याने बिघडत आहेत. भारताच्या कठोर भूमिकेनंतर पाकिस्तान धास्तावला आहे. याचदरम्यान अफगाणिस्तानचे माजी उपाध्यक्ष अमरुल्लाह सालेह यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

Advertisement

भारताने स्वत:च्या शत्रूच्या विरोधात इलेक्ट्रिक चेयरचा वापर करण्याऐवजी त्याच्या गळ्यात एक लांब दोरखंड टाकला आहे असे उद्गार सालेह यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये काढले आहेत. भारत स्वत:च्या शत्रूला विजेच्या एका झटक्याने मारण्याऐवजी तडफडवत शिक्षा देत असल्याचे सालेह यांचे म्हणणे आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर जगभरातील नेते निंदा करत असतानाही अमरुल्लाह यांनी पोस्ट शेअर करत भावना व्यक्त केली होती. दहशतवाद विरोधात या पोकळ सांत्वनेवर विश्वास ठेवणे मूर्खपणा ठरेल, जेव्हा तुम्ही खरोखरच दहशतवाद विरोधातील लढाई लढाल, तेव्हा यातील अनेक जण स्वत:चे हात मागे घेतील आणि काही लोक स्वत:च्या लाभासाठी त्याच दहशतवादाचे समर्थन देखील करतील असे त्यांनी म्हटले होते.

सालेह हे अफगाणिस्तानच्या पंजशीर प्रांताशी संबंधित आहेत. अत्यंत कमी वयात ते परिवाराला मुकले आणि अहमद शाह मसूद यांच्या नेतृत्वात तालिबानविरोधी चळवळीचा हिस्सा झाले. तालिबानने 1996 मध्ये अमरुल्लाह यांच्या बहिणीची व्रूरपणे हत्या केली होती.

Advertisement
Tags :
##tarunbharatnews#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article