Chandrakant Patil : कोल्हापुरातील बड्या नेत्याचा होणार पक्षप्रवेश ; मंत्री चंद्रकांत पाटील
दिवाळीनंतर आचारसंहिता; निवडणूक तयारीला लागा
कोल्हापूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची लवकरच घोषणा होईल. दिवाळीनंतर दोन दिवसात आचारसंहिता जाहीर होईल. नोव्हेंबरमध्ये जि. प. तर डिसेंबरमध्ये मनपा निवडणुका होतील. त्यामुळे निवडणुकीच्या तयारीला लागा, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
कुर (ता. भुदरगड) येथे विजय संकल्प मेळाव्यात ते बोलत होते. महायुती म्हणूनच निवडणुका लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यकर्त्यांचा बळी देणार नाही, मैत्रीत चंद्रकांत पाटील म्हणाले, २०१९ साली ज्यांचे तिकीट नाकारले त्या बावनकुळे यांना २०२४ च्या विधानसभा निवडणुकीचे उमेदवार ठरवण्याचे मिळाले.
निवडणूक अधिकार ही फास्ट ट्रेनप्रमाणे आहे. प्लॅटफार्मवर जो राहील, तो राहील. मात्र, नाराज होऊ नका. राजकारणात प्रयत्नाबरोबर नशीब देखील लागतं. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मोठा फरक असला पाहिजे.
२०१७ ची परिस्थिती बदला, त्यासाठी लोकांना भेटून संपर्क वाढवा. निवडणूक महायुती म्हणून लढवायची आहे मात्र शेवटच्या क्षणी कोणता निर्णय घ्यायचा हे वरिष्ठ नेते ठरवतील, असेही ते म्हणाले. कोणत्याही कार्यकर्त्यावर अन्याय होऊ देणार नाही, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना मागत असलेल्या ठिकाणी आपला चांगला उमेदवार असेल तर मैत्रीत लढू, पण कार्यकर्त्यांचा बळी दिला जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
कोल्हापुरातील मोठ्या नेत्याचा होणार पक्षप्रवेश
सांगलीमध्ये शरद लाड यांचा पक्षप्रवेश मंगळवारी होणार आहे. कोल्हापूर आणि सांगलीत मंगळवारी मोठे पक्षप्रवेश होणार आहेत. त्यांचे वडील विद्यमान आमदार असल्यामुळे आणि जास्तीतजास्त मतदान नोंदणी केल्याने त्यांनी उमेदवारीवर हक्क सांगितला आहे. कोल्हापुरातील प्रवेश करणाऱ्या नेत्याचं नाव समोर येईल. मी कोल्हापुरातून कधीच लक्ष काढलं नव्हतं. मला पक्ष जी जबाबदारी देतो, ती मी पार पाडतो. पश्चिम महाराष्ट्रावर मला लक्ष केंद्रित करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी के सांगितले आहे, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली.
जि. प. झाली की लगेच मनपाची तयारी
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत कोर्टातील सगळ्या याचिका संपल्या. न्यायालयाने आता निवडणुका घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोल्हापूर जिल्हा परिषदेवर आणि सर्व पंचायत समित्यांवर महायुतीचा अध्यक्ष, सभापती असला पाहिजे. जिल्हा परिषद झाल्यानंतर लगेच महानगरपालिकेची तयारी आम्ही करणार आहोत, असे ते म्हणाले.
आमदार रोहित पवारांना काय कामधंदा आहे का?
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केलेल्या टीकेवर मंत्री पाटील यांनी प्रत्युत्तर दिले. आमदार रोहित पवारांना काय कामधंदा आहे का? मी काय करायचे हे त्यांनी मला शिकवण्याची गरज नाही. कोणत्या प्रकरणात आम्ही काय भूमिका घेतो हे ढोल वाजवून सांगायची सवय आम्हाला नाही, असे म्हणत पाटील यांनी रोहित पवार यांना फैलावर घेतले.
गौतमी पाटील यांच्यावाहनाच्या अपघातावरुन टीका
लावणी नृत्यांगना गौतमी पाटीलच्या वाहनाने एका रिक्षाला धडक दिली. याबाबत मंत्री पाटील म्हणाले, गौतमी पाटीलच्या वाहनाने रिक्षावाल्याला उडवले. यात रिक्षा चालक गंभीर जखमी झाला. माध्यमांनी अपघाताच्या अनेक बातम्या लावल्या. कारवाई करणार की नाही असे अनेक प्रश्न उपस्थित केले. संबंधित रिक्षाचालकाची मुलगी माझ्या ऑफिसमध्ये आली. त्यानंतर मी डीसीपींना फोन लावला. मात्र त्या वाहनामध्ये गौतमी पाटील नव्हती, असे समोर आले. मात्र यावरून विरोधकांनी टीका सुरू केली.