For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सर्वसामान्यांना लसणाचा चटका

10:52 AM Feb 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
सर्वसामान्यांना लसणाचा चटका
Advertisement

प्रतिकिलो 400 रुपये, दर आवाक्याबाहेर

Advertisement

बेळगाव : कडधान्य, डाळी आणि भाजीपाल्याच्या दरापाठोपाठ आता लसणाच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची फोडणी आणि चटणीही महागली आहे. मागील काही दिवसांपासून लसणाच्या दरात झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. किरकोळ बाजारात लसणाचा दर 400 रुपये किलोवर पोहोचला आहे. त्यामुळे लसूण सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहे. बदलत्या हवामानामुळे लसूण पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे आवक कमी झाल्याने लसणाचे दर भरमसाट वाढले आहेत. आधीच जनता महागाईने त्रस्त झाली आहे. त्यातच दैनंदिन स्वयंपाकात लागणाऱ्या लसणाचे दर वाढल्याने सर्वसामान्यांना खरेदी करणे कठीण होऊ लागले आहे. एरव्ही 100 ते 120 रुपये किलो मिळणारी लसूण 400 रुपये किलो झाली आहे. त्यामुळे फोडणी आणि खमंग पदार्थ बनविणाऱ्यांना फटका बसू लागला आहे.

लसणाची आवक कमी

Advertisement

बदलत्या हवामानामुळे लसूण उत्पादनात मोठी घट झाली आहे. इतर राज्यांतून लसणाची आवक कमी झाली आहे. त्यामुळे बाजारात लसूण दरात वाढ झाली आहे. नवीन लसूण दाखल झाल्यानंतरच दरात घट होईल, असा अंदाजही विक्रेत्यांतून व्यक्त होत आहे. दैनंदिन वस्तुंच्या किमती वाढत चालल्याने गोरगरीब आणि सर्वसामान्यांना जगणे असह्या होऊ लागले आहे.

Advertisement
Tags :

.