महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

तालिबानला मोठा झटका

06:08 AM Dec 21, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

संयुक्त राष्ट्रसंघाने सदस्यत्वाचा दावा फेटाळला

Advertisement

वृत्तसंस्था / संयुक्त राष्ट्रसंघ

Advertisement

अफगाणिस्तानात दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून सत्तेवर असलेल्या तालिबानला मोठा झटका बसला आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या शक्तिशाली समितीने सलग तिसऱ्यांदा तालिबानी राजवटीचा सदस्यत्वाचा दावा फेटाळला आहे. या सदस्यत्वानंतरच संयुक्त राष्ट्रसंघात तालिबानी प्रतिनिधीला मान्यता मिळू शकली असती. याप्रकरणी तालिबानला पाकिस्तानची साथ मिळाली नसल्याचे मानले जात आहे. टीटीपीवरून तालिबान आाणि पाकिस्तान यांच्यात सध्या तणावाचे वातावरण आहे.

अशरफ गनी सरकारला हटवरून तालिबानी दहशतवादी ऑगस्ट 2021 मध्ये अफगाणिस्तानच्या सत्तेवर आले होते. तेव्हापासून ते जागतिक मान्यता मिळावी म्हणून प्रयत्नशील आहेत. याचमुळे संयुक्त राष्ट्रसंघात स्वत:चा प्रतिनिधी नियुक्त करण्याचा त्यांचा प्रयत्न असला तरीही सलग तिसऱ्यांदा तालिबानला निराशा पत्करावी लागली आहे. तालिबानी राजवटीने सुहैल शाहीन यांना संयुक्त राष्ट्रसंघात स्वत:चा प्रतिनिधी नियुक्त केले होते. परंतु संयुक्त राष्ट्रसंघाच्या समितीने तालिबानच्या या नियुक्तीला फेटाळले आहे.

या समितीते सुरक्षा परिषदेचे तीन स्थायी सदस्य रशिया, चीन आणि अमेरिकेचे प्रतिनिधी सामील होते. या समितीच्या बैठकीत तालिबानी प्रतिनिधीला मान्यता न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अफगाणिस्तानच्या अंतरिम सरकारला अद्याप जगभरातून मान्यता मिळाली नसल्याचा दाखला समितीने दिली आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या या निर्णयानंतर नासिर अमाद फैक हेच अफगाणिस्तानचे प्रतिनिधित्व करत राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. नासिर यांची नियुक्ती अशरफ गनी सरकारकडून करण्यात आली होती. तालिबानने महिलांना अधिकार दिल्यास, सर्वसमावेशक सरकार स्थापन केल्यास आणि जागतिक जबाबदाऱ्यांचे पालन केले तरच मान्यता देऊ असे संयुक्त राष्ट्रसंघाने स्पष्ट केले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article