कोल्ह्याच्या मांसाने तयार होणारे पेय
नेपाळच्या पर्वतीय भागांमधील काही समुदाय कोल्ह्याच्या मांसाने तयार एका विशेष काढेवजा पेयाचे सेवन करतात. स्थानिक मान्यतांनुसार याला मर्यादित प्रमाणत पिल्याने गुडघे, कंबर आणि सांधेदुखीपासून दिलासा मिळतो. परंतु या दाव्यांची वैज्ञानिक पुष्टी उपलब्ध नाही. या पेयाला अनेक लोक औषधीय काढा मानतात. घरांमध्ये वृद्ध पारंपरिक पद्धतीने हे पेय तयार केले जाते आणि मग दररोज अत्यंत कमी प्रमाणात याचे सेवन करण्यात येते. सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओत काही लोक ग्लासातून हे पेय पिताना दिसून येतात, याचमुळे हा आता चर्चेचा विषय ठरला आहे. स्थानिक मान्यतांनुसार या पेयाला तयार करण्याची प्रक्रिया अत्यंत वेळ घेणारी आहे.
याच्या निर्मितीसाठी अनेक पारंपरिक विधींचे पालन केले जाते, जी पिढ्यानपिढ्या पुढे जात आहे. विविध क्षेत्रांमध्ये याची विधी आणि सामग्रीत काही अंतर सांगण्यात येतो. परंतु अशाप्रकारच्या दाव्यांवरून आरोग्यतज्ञ खबरदारी बाळगण्याचा सल्ला देतात. कुठलाही खाद्यपदार्थ किंवा पेय केवळ लोकमान्यतांच्या आधारावर औषधी मानणे योग्य नसल्याचे तज्ञांचे सांगणे आहे. जर कुठल्याही व्यक्तीत दीर्घकाळापासून गुडघे, कंबर किंवा सांधेदुखी असेल तर त्याने डॉक्टरकडून तपासणी अन् उपचार करवून घ्यावेत. कुठल्याही वन्यप्राण्याशी निगडित उत्पादनांच्या सेवनामुळे संक्रमण आणि इतर आरोग्यसंबंधी जोखीम होऊ शकते. याचमुळे अशा पदार्थांचे सेवन वैज्ञानिक पुरावे किंवा वैद्यकीय सल्ल्याशिवाय करू नयेत असे तज्ञांचे सांगणे आहे. कोल्हा एक वन्यजीव असून अनेक देशांमध्ये वन्यजीव संरक्षणसंबंधी कायदा लागू आहे.