स्वत:ला श्वान मानणारी सुंदर युवती
गळ्यात पट्टा अन् डोक्यावर कान लावून करते अजब कृत्य
लोकांच्या चित्रविचित्र छंदांवरून अनेकदा आश्चर्य व्यक्त केले जात असते. यातील काही जणांना महिलांसारखे कपडे परिधान करून ऑफिसमध्ये जायचे असते, तर काही जणांना विचित्र गोष्टी जमवायच्या असतात. परंतु अमेरिकेतील एक 20 वर्षीय सुंदर युवती स्वत:ला माणूस नव्हे तर श्वान मानते. या युवतीचे नाव मिल्क लव आहे. युवतीच्या या दाव्यामुळे सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
मिल्क ही श्वानांप्रमाणे वागण्यासोबत स्वत:ची लाइफस्टाइल देखील तिने पूर्णपणे एका ‘पामेरियन’ श्वानाप्रमाणे पेली आहे. मिल्क लवला सार्वजनिक ठिकाणी श्वानांप्रमाणे कान आणि शेपूट लावून फिरताना पाहिले जाऊ शकते. सर्वात चकित करणारी बाब म्हणजे तिला दुसऱ्यांसाठी ‘ट्रिक्स’ दाखविणे आणि याच्या बदल्यात ‘ट्रीट’ मिळविणे अत्यंत पसंत आहे.
मिल्क लवने स्वत:च्या या अनोख्या लाइफस्टाइलची सुरुवात कॉलेजच्या दिवसांमध्ये केली होती. बालपणीच मी स्वत:चा पाळीव श्वान ‘मोंटी’सोबत खेळताना अनेकदा मी देखील एक श्वान असते तर अशी कल्पना करायचे. वय वाढण्यासोबत माझा हा ओढा कमी होण्याऐवजी वाढतच गेला. प्रारंभी मी स्वत:ची ओळख शोधण्यासाठी अनेक प्रकारच्या फॅशनला अवलंबिले, ज्यात कधी मी पायरेट झाले, कधी गोथ तर कधी हिप्पी. परंतु टिकटॉकवर एका मुलीला श्वानाच्या कानासारखा हेडबँड घातलेला पाहिल्यावर मला दिलासा मिळाला. तेथूनच मला ‘केमोनोमिनी’ शब्दाविषयी कळले, ज्याचा वापर जपानमध्ये अशा लोकांसाठी केला जातो, जे प्राण्यांसारखी वैशिष्ट्यो अवलंबितात असे ती सांगते. यानंतर मिल्क हळूहळू स्वत:ला पूर्णपणे श्वानाप्रमाणे वागवू लागली.
मिल्क लवकडे आता श्वानांसारखे दिसण्यासाठी खास वॉर्डरोब आहे, ज्यावर तिने हजारो रुपये खर्च केले आहेत. तिच्याकडे एक हायपर मोशन शेपूट असून जी चालताना हुबेहुब श्वानाप्रमाणे हलते. याचबरोबर तिने आता 50 हजार रुपयांपेक्षा अधिक खर्च करत ‘टोकदार दात’ लावण्याची तयारी केली आहे. मिल्क अनेकदा स्वत:च्या मित्रांसोबत ‘पपी प्ले’मध्ये भाग घेते, ज्यात तिचे मित्र तिच्या हँडलरच्या भूमिकेत असतात. ती बॉलमागे धावते, फरशीवर लोटते आणि मालकाच्या आदेशावर कसरती करते. या बदल्यात तिच्या डोक्यावर हाताने गेंजारणे आणि खाण्याचे पदार्थ मिळणे तिला पसंत आहे. परंतु समाजात अशाप्रकारच्या जीवनशैलीला स्वीकार करणे सोपे नाही. जेव्हा मी बाहेर पडते, तेव्हा लोक माझ्याकडे विचित्र नजरेने पाहत असतात असे मिल्क सांगते.
मिल्कचे पिता आणि बहिण तिच्या या पसंतीला पूर्ण समर्थन देतात. तर तिची आई तिने किमान घराबाहेर सामान्य माणसाप्रमाणे वागावे या मताची आहे.