कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

नेत्रदत्त सृष्टीदर्शन कलेतून पर्यावरणाचा सुरेख संदेश

02:46 PM May 02, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

सावंतवाडीत चित्र प्रदर्शन ; सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांकडून चित्रांचे कौतुक

Advertisement

सावंतवाडी प्रतिनिधी-

Advertisement

डॉ. नेत्रा सावंत, ज्येष्ठ चित्रकार श्री हरेकृष्ण भगवान आणि विश्राम भगवान यांच्या 'नेत्रदत्त' सृष्टीदर्शन या पर्यावरणपूरक चित्रांच्या सामूहिक प्रदर्शनाचे आज सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिरात सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले. ही चित्रे केवळ सुंदर नाहीत, तर ती पर्यावरण संरक्षण आणि जीवनात आध्यात्माचे महत्त्व रुजवणारे महान कार्य करत आहेत, असे गौरवोद्गार जिल्हाधिकारी पाटील यांनी काढले.याप्रसंगी सावंतवाडी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी अश्विनी पाटील यांच्यासह डॉ. जयेंद्र परुळेकर, राजेश नवांगुळ, डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर, डॉ. उमेश मसूरकर, अच्युत सावंत भोसले, विक्रम भांगले या प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती होती. तसेच कार्यक्रमाला डॉ. दत्तात्रय सावंत, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब बोर्डेकर, ॲड. स्वप्निल प्रभू आजगावकर, ज्येष्ठ पत्रकार रमेश बोंद्रे, सीताराम गावडे, अभिमन्यू लोंढे, विजय देसाई, ॲड. संतोष सावंत आणि प्रा. रुपेश पाटील आदी मान्यवरांनी हजेरी लावली होती.कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. नेत्रा सावंत आणि डॉ. दत्तात्रय सावंत यांनी उपस्थितांचे स्वागत केले. त्यानंतर दीपप्रज्वलन आणि गणेशपूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. या सुंदर प्रदर्शनाचा सावंतवाडीकरांनी लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी केले. हे प्रदर्शन आणि विक्री २ ते ४ मे दरम्यान सर्वांसाठी खुले असून, प्रदर्शनस्थळी चित्रांची विक्रीदेखील केली जाणार आहे. त्यामुळे कलाप्रेमी आणि पर्यावरणप्रेमी नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. नेत्रा सावंत, हरेकृष्ण भगवान आणि विश्राम भगवान यांनी केले आहे.

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg # news update # konkan update # sawantwadi # marathi news #
Next Article