महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

...क्रिप्टो बाजारात नरमाईचा कल

07:00 AM Mar 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

Advertisement

सोमवारी क्रिप्टो मार्केटमध्ये कमजोरी दिसून आली. बिटकॉइनची किंमत 1.5 टक्क्यांनी घसरून 26,157 डॉलरवर आली. त्याचवेळी, इथरियमची किंमत 1,600 डॉलरच्या खाली गेली. दरम्यान, जागतिक क्रिप्टोकरन्सी मार्केट कॅप 1.04 ट्रिलियन डॉलरपर्यंत कमी झाले. गेल्या 24 तासांत जागतिक क्रिप्टोकरन्सी मार्केट कॅपमध्ये 1.16 टक्क्यांनी घट झाली आहे.

Advertisement

क्रिप्टो मार्केटमधील कमकुवतपणाचे कारण जाणून घ्या

बायकॉईनचे सीएमओ अतुल्य भट्ट यांनी सांगितले की, आठवड्याच्या शेवटी बाजारात कमजोरी होती आणि बिटकॉइन 27,000 डॉलरची पातळी राखण्यात अपयशी ठरले. कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ आणि भू-राजकीय अनिश्चिततेमुळे आगामी काळात क्रिप्टो बाजाराच्या गतीवर परिणाम होऊ शकतो.

 बिटकॉइनच्या किमती आणखी कमी होणार

दरम्यान, मुड्रेक्सचे सीईओ आणि सह-संस्थापक एडुल पटेल म्हणाले की बिटकॉइनची किंमत सध्या 26,000 डॉलरच्या वर आहे. यावेळी बाजारातील कमकुवतपणाला तोंड देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न होत आहेत. बिटकॉइनला सध्या 27,500 डॉलरच्या पातळीवर प्रतिकाराचा सामना करावा लागत आहे. तथापि, सध्याच्या पातळीपासूनही किमतींमध्ये घट होऊ शकते आणि बिटकॉइनची किंमत पुन्हा एकदा 25,400 डॉलरच्या सपोर्ट झोनच्या आसपास घसरण्याची शक्यता आहे.

इतर क्रिप्टो टोकन देखील घसरले

जर इतर प्रमुख क्रिप्टो टोकन्सचा विचार केल्यास एक्सआरपी आणि टोकॉइनमध्ये तीन टक्क्यांपर्यंत घसरण दिसून आली. त्याचवेळी, डोजेकॉइन,   इथरियम, बीएनबी आणि सोलानामध्ये देखील एक टक्क्यांपर्यंत घसरण नोंदवली गेली.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article