माणसांप्रमाणे माकडाला दाढी
अमेझॉनच्या वर्षावनांमध्ये अनोखे माकड
अमेझॉनच्या घनदाट जंगलांमध्ये एक असे अनोखे माकड राहते, ज्याला पाहून कुणीही चकित होऊन जातो. या माकडाचे नाव बियर्डेड साकी मंकी असून याची सर्वात खास ओळख याची लांब दाढी असून ती अत्यंत माणसांप्रमाणे दिसते. खासकरून नर माकडांची दाढी इतकी प्रभावशाली असते की ती दाखवून माकड जंगलात तोरा मिरवत असते. माकडीण याच दाढीला पाहून आकर्षित होत असते. बियर्डेड साकी मंकी दक्षिण अमेरिकेच्या अमेझॉन वर्षावनांमध्ये आढळून येते. हे मुख्यत्वे ब्राझील, गयाना आणि आसपासच्या क्षेत्रांमध्ये दिसून येते. याचे शास्त्राrय नाव चिरोपोटेस जीनस च्या अंतर्गत येते. याचे सर्वात आकर्षक वैशिष्ट्या डेकं आणि चेहऱ्यावरील केस आहे. नर माकडांच्या चेहऱ्यांवर काळी दाढी असते, तर डोक्यावर दोन चेंडूंप्रमाणे केसांचे गुच्छ असतात, जे त्यांना आणखी अनोखा लुक मिळवून देतात. हे माकड मध्यम आकाराचे असते. त्यांचे वजन जवळपास अडीच ते साडेतीन किलोग्रॅमपर्यंत असते. या माकडाच्या शरीराची लांबी 40-45 सेंटीमीटर असते आणि शेपूटही जवळपास तितकेच लांब असते. शेपूट दाट केसांनी युक्त असते. याचे शरीर बहुतांशकरून काळे किंवा करड्या रंगाचे असते. खांद्यांवर आणि पाठीवर केस काही लांब असतात, जे त्यांना केपसारखा लुक देतात.
दाढी आहे खास
बियर्डेड साकी मंकीची दाढी केवळ दाखविण्यापुरती नाही. ही दाढी त्यांच्या सोशल लाइफमध्येही महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. नर माकड स्वत:ची दाट दाढी दाखवून इतर नरांवर दबदबा निर्माण करतो आणि मादींना आकर्षित करतात. जंगलात हे माकड दाढी झाडत फिरताना दिसून येते, ज्यामुळे त्यांचा तोरा आणखी वाढतो. हे माकड दिवसा सक्रीय राहते, झाडांवरील फांद्यांवर वावर असणारे हे माकड अत्यंत चांगल्याप्रकारे उड्या मारू शकते.
सीड प्रिडेटर
या माकडाचा आहार मुख्यकरून फळे, बीज आणि कठोर नट्सवर आधारित असतो. त्यांचे दात इतके मजबूत असतात की ते अत्यंत कठोर फळांच्या साली सहजपणे तोडू शकतात. याचमुळे त्यांना सीड प्रिडेटरही म्हटले जाते. बियर्डेड साकी मंकी सामाजिक प्राणी आहे. ते छोट्या छोट्या समुहांमध्ये राहतात, ज्यात 10-30 सदस्य असू शकतात. समुहात ते एकमेकांना ग्रूम करतात, खेळतात आणि एकत्र भोजन करतात. कधीकधी अन्य माकड प्रजातींसोबतही त्यांची मैत्री दिसून येते.
प्रजाती संकटात
अमेझॉनच्या जंगलांमध्ये होणारी वृक्षतोड, शिकार आणि अधिवासाच्या नुकसानीमुळे अनेक साकी प्रजाती संकटात आहेत. ब्लॅक बियर्डेड साकी यासारख्या काही प्रजातींच्या माकडांची संख्या अत्यंत कमी झाली आहे. अनेक संघटना त्यांच्या सुरक्षेसाठी प्रयत्न करत आहेत. हे माकड अमेझॉनच्या जैवविविधतेचा महत्त्वपूर्ण हिस्सा आहे. या माकडाचे मजबूत जबडे आणि दात त्यांना प्रतिकूल पर्यावरणातही जिवंत राहण्यास मदत करतात.