For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

धार्मिक महत्त्वाचा समुद्र किनारा

06:29 AM Mar 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
धार्मिक महत्त्वाचा समुद्र किनारा

सागर किनाऱ्यांवरील पर्यटनस्थळ केवळ सुंदरतेसाठी ओळखले जाते, परंतु एखाद्या समुद्र किनाऱ्याचे धार्मिक महत्त्व असल्याचे आणि तेथे जाऊन लोक नवस करत असल्याचे कधी ऐकले आहे का? युकेच्या वेल्श किनाऱ्यावर एक असे ठिकाण आहे ज्याविषयी अनेक प्रकारच्या दंतकथा आहेत आणि लोक येथे जादुई घंटा नावाने प्रसिद्धखडक पाहण्यासाठी येत असतात.

Advertisement

वेल्शचा किनारा सुंदर किनाऱ्यांसाठी प्रख्यात आहे. परंतु त्यात एक छोटीशी इमारत देखील दडलेली आहे. ती काळजीपूर्वक पाहिली तरच दिसून येते. सेंट गोवन नावाचे पूजास्थळ एका संताचा आश्रम असून तो साउथ पेमब्रोकशायरच्या बोशेरस्टोनच्या सेंट गोवनच्या शिखरावर तयार करण्यात आला आहे. हे ठिकाण अनेक प्रकारच्या लोककथांना सामावून आहे. यात जादुई घंटी, सागरी चाचे, काही मिथकं, काळानुसार बदललेले जिने यांचा समावेश आहे. 13 व्या शतकात हा आश्रम किंवा पूजास्थळ सेंट गोवनच्या सन्मानार्थ तयार करण्यात आला होता, 6 व्या शतकात त्यांचे येथे वास्तव्य होते. सेंट गोवन यांचा सागरी चाच्यांनी  पाठलाग केला होता, यावेळी सेंट गोवन एका खडकयुक्त खाडीत सागरी चाचे परत जाईंपर्यंत लपून बसले होते. याच ठिकाणी आता हे पूजास्थळ आहे. सेंट गोवन हे तेव्हापासून खडकांमध्ये राहू लागले आणि जादुई घंटा वाजवून आसपासच्या लोकांना सागरी चाच्यांविषयी सतर्क करू लागले.

कथेनुसार सागरी चाच्यांनी जादुई घंटा चोरण्याचा कट रचला आणि त्यात ते यशस्वी देखली ठरले. परंतु त्यांचे जहाज वादळात बुडाले. यानंतर एंजेल्सनी ही घंटा परत मिळविली. ही घंटा सेंट गोवन यांना परत केल्यावर ती आता एका मोठ्या खडकात ठेवण्यात आली आहे, जेणेकरून ती पुन्हा चोरीला जाऊ नये. आता लोक या बेल रॉकला पाहण्यासाठी  येत असतात. ही बेल इच्छा पूर्ण करत असल्याचे बोलले जाते. या पूजाघराच्या जिन्यांविषयी देखील एक कथा प्रचलित आहे. जेव्हा कुणी याच्या पायऱ्या मोजण्यास सुरुवात करतो तेव्हा याची संख्या सातत्याने बदलत असते असे बोलले जाते.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
×

.