Solapur : आ. अभिजित पाटलांनी विठ्ठलाच्या पादुका डोक्यावर घेत विठ्ठल संरक्षण विन केला साजरा
विठ्ठलमूर्ती संरक्षण महोत्सव भक्तिभावाने साजरा
पंढरपूर : श्री विठ्ठलमूर्ती संरक्षण महोत्सव २०२५ हा धार्मिक आणि सांस्कृतिक उत्साहात भक्तिभावाने दरवर्षी पार पडला जातो. श्रीक्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिरातील नामदेव पायरी येथून विठ्ठलाच्या पादुका देगावकडे प्रस्थान झाल्या. दुपारी १ वाजता श्री विठ्ठल पादुकांचे पूजन आमदार अभिजित पाटील व मान्यवरांच्या हस्ते झाले.
इ.स. १६९५ ते १६९९ या काळात मुगल बादशहा औरंगजेबाने महाराष्ट्रातील श्रीक्षेत्र तुळजापूर आणि श्रीक्षेत्र पंढरपूरसह विविध हिंदु देवस्थाने उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला होता. त्या काळात श्री विठ्ठल भक्त स्व. प्रल्हादपंत बडवे यांनी श्रीक्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल मूर्तींचे संरक्षण करण्याची जबाबदारी देगाव येथील स्व. सूर्याजी पाटील (आमदार अभिजित पाटील यांचे पूर्वज) यांच्या पूर्वजांकडे सोपवली होती.
या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षी अश्विन वैद्य नवमी या दिवशी श्री विठ्ठलमूर्ती संरक्षण महोत्सव म्हणून साजरा केला जातो. यावेळी कीर्तनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे प्रभावी कीर्तन तसेच सायंकाळी ह.भ.प. चैतन्य महाराज वाडेकर यांचे कीर्तन भक्तिभावाने झाले.