Hatkanangale News | इंगळीत ७० फूट खोल विहिरीत पोकलेंड कोसळला अन्...!
हुपरीतील इंगळी गावात विहिरीत पोकलँड कोसळले
हुपरी- हातकणंगले तालुक्यातील इंगळी गावाच्या मोक्याच्या ठिकाणी रस्त्याच्या कडेला असलेली अनेक वर्षापासूनची जुन्या काळातील भूस्खलन झालेल्या सहा मोट विहीरीचे काम सुरू असताना अचानक जमीन खचल्याने अवजड असलेले पोकलँड दोन कामगारासह विहीरीत बुडाले. दरम्यान दोन कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यात नागरिकांना यश आले. सिंता भरती (वय १८) आशिष शरमण (वय २१) अशी बुडालेल्यांची नावे असून यांच्यावर हुपरी येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत घटनास्थळावरून व पोलिसातून मिळालेली माहिती अशी इंगळी येथील गावांतर्गत मुख्य रस्ता उर्दू शाळा ते जिल्हा परिषद शाळा यामध्ये असलेली सहा मोट विहीर गेल्या वर्षी भूस्खलन झाली होती. यावर विहिरीसाठी आपत्ती व्यवस्थापन विभागार्तंगत ३ कोटी ४२ लाख रुपयांच्या मंजूर निधीतून आठ दिवसापासून काम सुरू होते. यावेळी डंपरमध्ये पोकलँडने विहिरीतील मुरूम भरण्याचे काम सुरू होते. मुरूम उत्तर दिशेला घेताना जमीन खचल्याने २५टनी पोकलँडच्या डोमचा तोल विहीरीच्या रिकाम्या बाजूला गेल्याने थेट ७० फूट खोल असलेल्या विहीरीत कोसळले. मात्र कोणाचीही जीवितहानी झालेली नाही. दोन्ही कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले.
गेल्या वर्षी अंकुश सकल झालेल्या विहिरीत दोन हजार लिटर पाण्याची टाकी आणि सात ते आठ खोके विहिरीत बुडाले होते. या विहीर कामासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाने तीन कोटी 42 लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टदार ठेकेदाराला एक काम देण्यात आले होते ठेकेदाराने आठवडाभरापासून काम सुरू केले होते आज दुपारी साडेतीनच्या सुमारास म्हणून मुरूम टाकण्याचे काम सुरू असताना मातीचा भराव खचला आणि पोकलेन विहिरीत पडला.
त्यावेळी प्रॉब्लेम मध्ये असलेले दोन कामगार विहिरीतील पाण्यात पडले घटनेत एका कामगाराने प्रसंग का वरदान दाखवत दुसऱ्या साथीदाराला पाण्यात उडत असल्याचे पाहून त्याला सुरक्षित बाहेर काढले स्थानिक नागरिकांच्या मदतीने दोघांनाही ताबडतोब हुपरी येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. घटना इतकी भीषण होती की क्षणात पोकलँड जमीनदोस्त झाला. त्यावेळी भयभीत झालेल्या चालकाने थेट हंबरडा फोडत मालकाच्या भीतीने पोकलँडको उपर निकालो असा टाहो फोडला. परंतु इंगळीतील नागरिकांनी त्यांना धीर दिल्याने दोघेही शांत झाले.
या घटनेची नोंद हुपरी पोलीस ठाण्यात ग्रामपंचायत प्रशासनाने दिली आहे. ताबडतोब पोलीस घटना स्थळी पोहचले आणि विहिरी शेजारी रहाणाऱ्या लोकांना ग्रामपंचायतीने स्थलांतर करण्याच्या दिलेल्या नोटिसाचा आधार घेत त्यांना स्थलांतर होण्यास सांगितले आहे.