For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

6 वर्षीय मुलीची कमाल

06:12 AM Oct 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
6 वर्षीय मुलीची कमाल
Advertisement

4.27 सेकंदात रुबिक क्यूब सॉल्व, विश्वविक्रमाची नोंद

Advertisement

ज्या रुबिक क्यूबला सोडविण्यास मोठमोठ्या लोकांना घाम फुटतो, तो चीनमधील 6 वर्षीय मुलीने केवळ काही सेकंदांमध्ये सोडवून नवा विक्रम केला आहे. चीनमधील 6 वर्षीय लियान युन्जीने 3गुणिले3 रुबिक क्यूबला अत्यंत वेगाने सोडवून महिलावर्गात नवा विश्वविक्रम केला आहे. चेंगदू येथील रहिवासी लियानला प्रेमाने ‘झिझी’असेही संबोधिले जाते.

लियानने चालू महिन्यात ग्वांगझूमध्ये झालेल्या दोन अशा स्पर्धांमध्ये भाग घेतला, ज्यांना वर्ल्ड क्यूब असोसिएशनकडून मान्यता मिळाली होती. या दोनही स्पर्धांमध्ये लियानने हा विश्वविक्रम केला आहे.

Advertisement

रुबिक क्यूब स्पर्धेत कुठल्याही स्पर्धकाला सर्वसाधारणपणे क्यूब 5 वेळा सोडवावा लागतो. यानंतर त्या प्रयत्नांच्या कालावधीची सरासरी काढले जाते. लियानने एका स्पर्धेत 4.52 सेकंद आणि दुसऱ्या स्पर्धेत केवळ 4.27 सेकंदांचा सरासरी वेळ नोंदविला. ती 3गुणिले3 रुबिक क्युबमध्ये 4.5 सेकंदांपेक्षा कमी सरासरी वेळ राखणारी पहिली महिला स्पीडक्यूब ठरली आहे.

दररोज 2-3 तासांचा सराव

लियानला बालपणी एका क्लासदरम्यान पहिल्यांदा रुबिक क्यूबची ओळख करून देण्यात आली होती. त्यावेळी ती नृत्य आणि संगीत यासारख्या इतर गोष्टीही शिकत होती. नंतर लियानची आई लिन यांग्शी यांना रुबिक क्यूब मुलांच्या अनेक क्षमतांना सुधारणारी कृती ठरू शकते अशी जाणीव झाली. यानंतर लियानने यावर अधिक लक्ष देण्यास सुरुवात केली. लियान आता रुबिक क्यूब सोडविण्यासाठी 1300 हून अधिक अल्गोदिरम शिकली आहे. लियान आता दररोज सुमारे 2-3 तास याचा सराव करते.

रुबिक क्यूब खास का?

रुबिक क्यूब केवळ एक कोडं वेगाने सोडविण्याचा खेळ नाही. याला सोडविल्याने मुलांची एकाग्रता, स्मरणशक्ती, तार्किक विचारशक्ती आणि गोष्टींना वेगवेगळ्या दिशेने समजून घेण्याची क्षमता सुधारू शकते. रुबिक क्यूब सोडविणे केवळ फॉर्म्युला आठवणीत ठेवण्यापुरती मर्यादित नाही. यात योग्य उपाय शोधण्यासाठी तार्किकपणे विचारही करावा लागतो असे लियानची आई सांगते. लियानच्या घरात तिने जिंकलेल्या अनेक ट्रॉफी ठेवलेल्या आहेत. वयाच्या केवळ 6 व्या वर्षी ही कामगिरी प्राप्त केल्यावर तिची कहाणी सोशल मीडिया आणि चिनी माध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे.

Advertisement
Tags :

.