For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Karad | साताऱ्यात सापडला ५४ वर्षांपूर्वीचा ठेवा! सायकल चालवण्यासाठी कर भरल्याचा 'तो' पुरावा चर्चेत

03:49 PM Apr 03, 2026 IST | NEETA POTDAR
karad   साताऱ्यात सापडला ५४ वर्षांपूर्वीचा ठेवा  सायकल चालवण्यासाठी कर भरल्याचा  तो  पुरावा चर्चेत
Advertisement

               साताऱ्यात नगरपालिका काळातील दुर्मिळ टोकन जतन

Advertisement

सातारा : एकेकाळीसायकल चालवण्यासाठी कर भरण्याची प्रथा असलेल्या काळाची साक्ष देणारा दुर्मिळ 'सायकल टॅक्स टोकन" सध्या चर्चेत आला आहे. १९७० च्या दशकातील हा धातूचा बिल्ला आज ऐतिहासिक वारशाचा महत्त्वाचा नमुना मानला जात असून, सैदापूर येथील वखार मालक सावरमल जहांगीड यांनी तो जतन करून ठेवला आहे.

सातारा या टोकनवर वरच्या बाजूला अर्धवर्तुळाकारात नगरपालिका असा कोरलेला मजकूर स्पष्ट दिसतो. मध्यभागी 'सायकल टॅक्स" अशी नोंद असून, खाली '१३७३" असा क्रमांक आढळतो. तसेच बाजूला '७१" आणि '७२" अशी वर्षे कोरलेली असून, हे टोकन १९७१-७२ या आर्थिक वर्षासाठी वापरले गेले असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Advertisement

नगरपालिका पूर्वी किंवासायकल ग्रामपंचायतीकडे चालवण्यासाठी कर भरणे अनिवार्य होते. कर भरल्यानंतर अशा प्रकारचे धातूचे टोकन सायकलच्या हँडलवर किंवा पुढील भागावर तार किंवा खिळ्याने बसवले जात असे. कर न भरल्यास सायकल जप्त करणे किंवा दंड आकारणे यासारख्या कारवाया केल्या जात. तज्ज्ञांच्या मते, भारतातील अनेक शहरांमध्ये ही करपद्धती १९७० च्या दशकापर्यंत अस्तित्वात होती. त्यानंतर हळूहळू ही प्रथा बंद झाली. आज अशा टोकन्सना 'अॅटिक" म्हणून मोठे ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. जहांगीड यांनी जपलेले टोकन अनमोल ठेवा आहे.

Advertisement
Tags :

.