For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

51 वर्षांची महिला प्रोपेशनल जलपरी

06:49 AM Dec 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
51 वर्षांची महिला प्रोपेशनल जलपरी
Advertisement

लहान मुले जेव्हा जलपरीच्या कहाण्या ऐकतात, किंवा त्यांना कार्टूनमध्ये पाहतात, तेव्हा त्यांना ते सत्य वाटू लागते. जलपरी केवळ कल्पना आहे, परंतु एका महिलेने या स्वप्नाला काही प्रमाणात सत्य केले आहे. ही महिला प्रोफेशनल मरमेड होण्यास यशस्वी ठरली असून याच्याच माध्यमातून तिने नाव कमाविले आहे.

Advertisement

ऑस्ट्रेलियात जन्मलेली हैना फ्रेजर ही प्रोफेशनल मरमेड (जलपरी) झाली आहे. हैना आता लॉस एंजिलिस आणि कोस्टा रिकादरम्यान राहते. बालपणापासून हैना फ्रेजरने स्वत:मध्ये समुद्राच्या दिशेने एक अजब आकर्षण अनुभवले आहे. बालपणापासून मी दोन्ही पायांना जोडून जलपरीप्रमाणे पोहत होते असे हैना सांगते.

जलपरी होण्याचा निर्णय

Advertisement

वयाच्या 9 व्या वर्षी हैनाने स्पॅल्श चित्रपट पाहिला, तेव्हा जलपरी होणे वास्तवही ठरू शकते याची जाणीव तिला झाली. स्वत:च्या आईच्या मदतीने तिने नारिंगी टेबलक्लॉथ आणि उशीमधील कापसाद्वारे पहिली शेपटी तयार केली आणि अनेक महिन्यापर्यंत ते परिधान करत पोहत राहिली. परंतु तिचे बालपण मेलबर्न, लॉस एंजिलिस आणि भारतातील शहरांमध्ये गेले, पण समुद्रापासून दूर राहणे तिला नेहमीच अवघड गेले. याचमुळे तिने कलेद्वारे स्वत:च्या स्वप्नाला जिवंत ठेवले, मरमेड आर्ट तयार करणे, मॉडेलिंग, कॉस्ट्यूम डिझाइनिंग आणि फोटोग्राफी तिचे प्रारंभिक करियर राहिले.

2002 साली आयुष्याला मिळाले वळण

2002 साली तिला एक अंडरवॉटर फोटोशूटची संधी मिळाली. याच्या छायाचित्रांना पाहिल्यावर पाणीच आपले खरे घर असल्याचे तिला वाटले. मग तिने प्रोफेशनल मरमेड होण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी बाजारात जलपरीची शेपटीही मिळत नवहती. मग तिने अनेक महिन्यांच्या मेहनतीद्वारे शेपटी तयार केली. आता तिच्याकडे 14 सिलिकॉन आणि 15 फॅब्रिक टेल्स आहेत. प्रत्येकाला तयार करण्यासाठी 6 महिन्यांपेक्षा अधिक काळ लागतो. हैना ऑक्सिजन टँक, वेटसूट आणि मास्कशिवाय खोल पाण्यात उतरते. ती 50 फूटांपेक्षा अधिक खोलपर्यंत फ्री डाइव्ह करू शकते आणि 4 मिनिटांपर्यंत श्वास रोखू शकते. सागरी जीवन संरक्षणासाठी ती शार्क, व्हेल, डॉल्फिन, सील, कासव आणि  रेजसोबत फोटोशूट करते.

सर्वात भयावह अनुभव

तिच्या सर्वात भयावह अनुभवांमध्ये 14 फूट लांब ग्रेट व्हाइट शार्कसोबत पोहणे होते. प्रारंभी ती अनेक आठवड्यांपर्यंत भीतीपोटी झोपू शकत नव्हती. परंतु पाण्यात उतरल्यावर एका अजब शांततेने तिला वेढले. एकदा एक शार्क थेट तिच्या दिशेने सरसावला, तिने पाण्यात ओरडत हात फैलावल्यावर शार्क मागे हटला होता. जेव्हा भीती वाटते तेव्हा मी ग्रेट व्हाइटला घाबरविले होते याची आठवण काढते. अनेकदा सागरी जीव मला अत्यंत जवळून धडकतात. एका शूटमध्ये माझे चमकणारे शेपूट पाहून शार्कने चावा घेतला होता, हा प्रकार नंतर एक प्रेमळ दिसणारे व्हायरल छायाचित्र ठरले होते असे ती सांगते. या अवघड पेशासाठी हैना कठोर दिनचर्या अवलंबिते. योग, नृत्य, ब्रीद वर्क, स्ट्रेचिंग आणि कठोर वेगन डायट ती पाळते.

Advertisement
Tags :

.