इजिप्तमध्ये मिळाले 4500 वर्षे जुने मंदिर
सूर्यदेवाची व्हायची पूजा : नाईल नदीच्या पाण्याने व्हायचा जलाभिषेक
हिंदू धर्म केवळ भारतापुरती मर्यादित नसल्याचे पुरावे इजिप्तमध्ये मिळाले आहेत. भारतात अनेक देवीदेवतांची पूजा केली जाते. अशाचप्रकारे बालीमध्sयही अनेक मंदिरे आहेत. आता पिरॅमिड्सचा देश इजिप्तमध्येही संशोधकांनी 4500 वर्षे जुने मंदिर शोधले आहे.
इजिप्तच्या कैरोपासुन 14 किलोमीटर अंतरावरील अबू घुरबमध्ये या मंदिराचे अवशेष मिळाले आहेत. हे मंदिर नाईल नदीपासून 8 किलोमीटर अंतरावर आहे. या मंदिराचे अवशेष एक हजार चौरस मीटरपर्यंत आढळून आले आहेत. या मंदिरात सूर्यदेवाची आराधना केली जात होती, तेथे सूर्यदेवाला गॉड रा या नावाने ओळखले जाते. इजिप्तिशियन माइथोलॉजीनुसार गॉ रा ला फादर ऑफ ऑल क्रिएशन म्हटले जाते. मंदिराची निर्मिती फरोह न्यूसेररे इनिच्या आदेशानुसार करण्यात आली होती. फरोहने इजिप्तवर ख्रिस्तपूर्व 2420 ते 2389 पर्यंत राज्य केले होते.
मंदिराच्या संरचनेच्या अवशेषांमध्ये अनेक गोष्टी मिळाल्या असून यात भिंतीवर एक कॅलेंडर कोरलेले आहे, ज्यात त्या काळातील सर्व धार्मिक कार्यक्रमांचा लेखाजोखा आहे. याच बरोबर मंदिराच्या भिंतीवर कलाकुसर दिसून आली असल्याची माहिती इजिप्तच्या पर्यटन मंत्रालयाने दिली आहे. या अवशेषांना या भागातील सर्वात मोठे मंदिर म्हणून पाहिले जात आहे. याचबरोबर उत्खननात अनेक भांडी मिळाली असून ती सेरेमिकची होती. या मंदिराविषयी सर्वप्रथम 1901 मध्ये एक जर्मन पुरातत्वतज्ञाने शोध लावला होता, परंतु याचे उत्खनन होऊ शकले नव्हते. या भागात भूजलाची पातळी अत्यंत अधिक होती, यामुळे उत्खननाच्या कामात अडथळे येत होते.
हळूहळू मिळत गेले पुरावे
2024 नंतर येथे मंदिरासाठी उत्खन करण्यात आले आणि निम्म्याहून अधिक अवशेष मिळाले. या उत्खननात मंदिराचे प्रवेशद्वार मिळाले आहे. तसेच अनेक प्रकारचे स्लॅब आणि दरवाजे आढळून आले. भिंतींचे हिस्से आणि त्यांचे डिझाइनही हस्तगत झाले आहे. या मंदिराच्या छताचा वापर अनेक प्रकारच्या एस्ट्रोनॉमिकल निरीक्षणासाठी केला जात होता असे या उत्खननाचे मुख पुरातत्वतज्ञ मस्सिमिलियाआनो नज्जालो यांनी सांगितले आहे.