महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

समुद्रात मिळाले 365 वर्षे जुने शहर

06:20 AM Dec 23, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मोठ्या रहस्याची झाली उकल

Advertisement

ग्रीसमध्ये सागरी भागात एका बुडालेल्या शहराचा शोध लागला आहे. हे शहर 375 वर्षे जुने असल्याचे मानले जात आहे. हा शोध ग्रीसच्या जकीन्थोस येथे सागरी किनाऱ्यानजीक लागला आहे. तज्ञांनी अटलांटिक सागराच्या मध्यात एका बेपत्ता बेटाचा शोध लावला आहे. हे बेट 375 वर्षांपूर्वी हरवले होते. पाण्याखालील या शहराचा शोध 2013 मध्ये जकीन्थोसच्या किनाऱ्यानजीक रहस्यमय अवशेष आढळून आल्यावर लागला होता.

Advertisement

हे बेट समुद्रसपाटीपासून 2-6 मीटर खोलवर आहे. यात दगडांनी तयार केलेले फुटपाथ आणि केंद्रस्थानी मोठ्या गोल आकारासोबत 20 स्तंभांचा पाया दिसून आला आहे. दगडाचे हे मोठे स्लॅब प्राचीन सार्वजनिक इमारतीचे असावेत असे मानले जात आहे. हे अवशेष पाहून पुरातत्व तज्ञांना हे एखादे बंदर किंवा प्राचीन इमारतीचा हिस्सा असल्याचे वाटले होते, परंतु यामागील रहस्याची आता उकल झाली आहे.

पुरातत्वतज्ञांनी या स्थळाची पाहणी करत नमुने जमविले आहेत. यातून निघालेले निष्कर्ष पाहता हे पाण्याखालील नैसर्गिक स्वरुपात 5 हजार वर्षांपूर्वी तयार झालेले काँक्रिट असल्याचे मानण्यात येतेय. हे संरचना तेथे असलेले खनिज आणि इतर गोष्टींमुळे दुर्लभ भूवैज्ञानिक घटनांमुळे तयार झाली होती. शोधाचे निष्कर्ष समोर आल्यावरही बेटावर राहणारे स्थानिक लोक हे अवशेष नैसर्गिक स्वरुपात तयार झाल्याचे मान्य करत नसल्याची स्थिती आहे. जुन्या दस्तऐवजांनुसार कधीकाळी एलीकनासच्या खाडीत इमारती होत्या, असे त्यांचे सांगणे आहे.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article