For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बसमध्ये सामूहिक अत्याचारानंतरही तिने तक्रार द्यायला नकार का दिला?

06:47 PM May 15, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
बसमध्ये सामूहिक अत्याचारानंतरही तिने तक्रार द्यायला नकार का दिला
Delhi Rape case
Advertisement

Gang Rape in Delhi | दिल्लीत काही वर्षांपुर्वी घडलेल्या 'निर्भया' प्रकरणाची देशभरात चर्चा झाली होती. अत्यंत निर्घृण अशा या हत्याकांडाने देशभरात संतापाची लाट उसळली होती. त्या भीषण घटनेची आठवण करुन देणारी एक घटना घडल्याने राजधानी पुन्हा एकदा हादरली आहे.  सोमवारी रात्री, वायव्य दिल्लीतील राणी बाग परिसरात एका धावत्या बसमध्ये चालक आणि वाहकाने एका ३० वर्षीय महिलेवर सामुहिक अत्याचार केला .

Advertisement

तक्रार का दाखल केली नाही?

या प्रकरणाचे अधिक धक्कादायक तपशील समोर येत असताना, असेही वृत्त आहे की गंभीर दुखापत होऊनही त्या महिलेने रुग्णालयात दाखल होण्यास नकार दिला, हिंदुस्थान टाईम्सच्या वृत्तानुसार याचे कारण पिडीत महिला म्हणाली मी तक्रार दाखल करायला गेले नाही कारण घरी माझ्या मुलांसाठी स्वयंपाक करायला कोणीही नव्हते.

Advertisement

 मंगोलपुरी येथील एका कारखान्यात काम करणारी आणि पीतमपुरा येथे आपल्या कुटुंबासह राहणारी पिडीत महिला, काम संपवून घरी परतत असताना सरस्वती विहार परिसरातील बी-ब्लॉक बस स्टँडजवळ ही घटना घडली, असे वृत्त एचटीने यापूर्वी दिले होते .तिने मार्गाचा काही भाग ई-रिक्षाने पार केला आणि त्यानंतर ती पायी पुढे गेली.

धावत्या बसमध्ये अत्याचार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तिला जवळच बस उभी असलेली दिसली आणि बस कंडक्टर तिच्याजवळ होता. तिने त्याला वेळ विचारली,. त्यानंतर त्या माणसाने तिला जवळ येण्याचा इशारा केला आणि तिला बसमध्ये ओढले.

पोलिसांच्या अहवालानुसार, बस नांगलोईच्या दिशेने अनेक किलोमीटर प्रवास करत असताना, त्या दोन पुरुषांनी धावत्या बसमध्ये जवळपास दोन तास आळीपाळीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर आरोपींनी तिला नांगलोई मेट्रो स्टेशनजवळ सोडून दिले.

Advertisement
Tags :

.