महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

3 वर्षांच्या बालकाला अजब आजार

06:42 AM Mar 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

खाण्याचीच वाटते भीती

Advertisement

जगात काही लोकांना पाण्याची भीती वाटते, तर काही जणांना अंधाराचे भय असते. परंतु कधी तुम्ही एखाद्या खाण्याचीच भीती वाटते असे ऐकले आहे का? कारण खाण्याशिवाय कुठलाही व्यक्ती जिवंत राहू शकत नाही. परंतु एक 3 वर्षीय बालकासोबत असे घडत आहे. त्याने एक वर्षापेक्षा अधिक काळापासून तोंडावाटे काहीच खाल्लेले नाही. त्याला ट्यूबच्या माध्यमातून अन्न पुरविण्यात येत आहे. इंग्लंडमध्ये राहणारा ओलिवर टेलर केवळ 2 वर्षांचा असताना त्याला कुपोषण आणि डिहायड्रेशनची समस्या होऊ लागली होती.

Advertisement

ओलिवरला एवोइडेंट रेस्ट्रिक्टिव्ह फूड इनटेक डिसऑर्डर आहे. यात माणसाला खाण्याचीच भीती वाटू लागते. किंवा खाण्याच्या चवीबद्दल नकारात्मक प्रतिक्रिया उमटते. ओलिविर हा ऑटिस्टिक असल्याने डिसऑर्डरमुळे तो अधिकच संवेदनशील ठरला आहे. तो खाण्यालाच घाबरतो असे ओलिवरची आई एमा यांचे सांगणे आहे. ओलिवरचे आईवडिल एमा आणि मॅटी टेलर यांनी स्वत:च्या मुलाची कहाणी शेअर करत लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.

ओलिवरला खाणे पसंत नाही. तो 2023 मध्ये बहुतांश काळ यंत्रांवरच निर्भर राहिला आहे. त्याला रात्रभरात 10 तास तर दिवसा 4 तास याच यंत्रांद्वारे अन्न दिले जात होते. आता देखील तो एका ट्यूबद्वारे अन्न प्राप्त करतो. मागील वर्षी एप्रिलमध्ये त्याच्या पोटात एक कायमस्वरुपी ट्यूब लावण्यात आली होती. ट्यूब फीडिगंमुळे सुमारे 12 महिन्यांमध्ये त्याच्या शरीराचे वजन एक तृतीयांशने वाढले आहे. परंतु त्याच्यावर आणि आमच्या परिवारावर पडणाऱ्या प्रभावाची कल्पना कुणीच करू शकत नाही. तो अद्यापही खाण्यावरून अत्यंत त्रस्त होतो आणि आम्ही फॅमिली डिनर आणि बर्थडे पार्टीचे आयोजन करू शकत नसल्याचे एमा यांचे सांगणे आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article