3 फूट घराला 2.5 कोटीची किंमत
चालण्या-फिरण्यासाठी नाही जागा
अधिकाधिक कमाई करत स्वत:साठी एक सुंदर, आलिशान घर खरेदी करण्याची प्रत्येकाची इच्छा असते. याकरता ते कुठल्याही प्रकारच्या मेहनतीपासून मागे हटत नाहीत. तुम्ही लोकांना छोट्यातून मोठ्या घरात जाण्याची स्वप्ने पाहताना ऐकले असेल. परंतु ब्रिटनमध्ये केवळ लोकेशनच्या नावावर एक असे घर विकले जात आहे, ज्यात चालणे-फिरणे देखील अवघड आहे.
केवळ 3 फूटांच्या घरासाठी तेथे 2.5 कोटी रुपयांची किंमत आकारली जात आहे. ब्रिटनमध्ये आकाराने छोटे असलेले हे घर विक्रीसाठी काढले गेले आणि लोक याच्या खरेदीसाठी रांगा लावत आहेत. कॉर्नवॉलच्या पोर्थलेवेन नावाच्य ाठिकाणी असे घर विकले जात आहे, ज्याला डॉल हाउस म्हणणे चुकीचे ठरणार नाही. दोन घरांदरम्यान असलेल्या रिकामी जागेत याची निर्मिती करण्यात आल्याचे याकडे पाहिल्यावर वाटू लागते.
3 फूट रुंद घर
मॅथर पार्टनरशिपकडून या घराची विक्री केली जात आहे. रियल इस्टेट एजंट टॉम रीड यांनी याची ऑफर मार्केटमध्ये प्रसारित केली आहे. या घराचे एकूण क्षेत्रफळ 339 चौरस फूट आहे. या घराची किंमत 2 लाख 35 हजार युरो इतकी आहे, म्हणजेच 2 कोटी 57 लाख 16 हजार 731 रुपयांमध्ये हे घर विकले जाणार आहे. या संपत्तीची किंमत केवळ आणि केवळ त्याच्या सुंदर दृश्यांमुळे इतकी अधिक आहे. यात एक किचन, डायनिंग हॉल, शॉवर रुम, बेडरुम आणि लिव्हिंग रुम आहे. घर अत्यंत प्रेमळ असून मॉडर्न लिव्हिंगसाठी परफेक्ट असल्याचा दावा करण्यात येत आहे. ज्या ठिकाणी हे घर आहे, तेथे आसपास समुद्र किनाऱ्यासोबत चांगली बाजारपेठ देखील आहे. याचमुळे या अत्यंत छोट्या घराच्या खरेदीसाठी लोक इच्छुक आहेत.
केवळ इतकीच समस्या...
या घराला विक्रीस काढलेल्या एजंटने घरात 4 लोकांच्या वास्तव्यासाठी जागा नसल्याचे स्पष्ट केले आहे. याचमुळे जो परिवार हे घर खरेदी करू इच्छितो, त्याच्याकरता हे कमी आकाराचे ठरणार आहे. 2017 मध्ये या घराची किंमत 2 कोटी 74 लाखाच्या आसपास ठेवण्यात आली होती, परंतु यावेळी याची विक्री करण्यात येत असताना किंमत काही प्रमाणात कमी ठेवण्यात आली आहे. या घराच डिझाइनमुळे याला बॉक्स अँड हीटर नाव देण्यात आले आहे.