उत्खननात मिळाले 2700 वर्षे जुने थडगे
उलटा मुकूट परिधान केलेल्या महिलेचा मृतदेह
इतिहास नेहमीच रहस्यांनी भरलेला राहिला आहे. अनेकदा जमिनीखाली गाडले गेलेल्या संस्कृती थक्क करत असतात आणि त्यांचे अवशेष त्या काळातील समाज, परंपरा आणि शक्तिसंतुलनाविषयी माहिती देत असतात. ग्रीसमध्ये आता पुरातत्वतज्ञांच्या एका टीमला एका महिलेचा 2700 वर्षे जुना सांगाडा मिळाला आहे. याच्या शिरावर एक विचित्र मुकूट उलटा ठेवण्यात आला होता. याचबरोबर थडग्यामधून आणखी अनेक गोष्टी मिळाल्या असून याद्वारे ही महिला एखाद्या शाही परिवाराशी संबंधित होती असे कळते.

एका सौरपार्कच्या निर्मितीची योजना सुरू झाल्यावर अधिकाऱ्यांनी कुठलीतरी कलाकृती वाचविण्यासाठी पूर्ण तपासणी आणि उत्खनन करण्याचा निर्देश दिला होता. यानंतर याठिकाणी असलेली अन्य थडगी पुरातन काळातील असल्याचे स्पष्ट झाले. पुरातत्वतज्ञांना मिळालेल्या सांगाड्याला बुरियल ऑफ द लेडी विथ द इनवर्टेड डियाडेम नाव देण्यात आले आहे. या महिलेचे मृत्यूसमयी वय 20-30 वर्षांदरम्यान राहिले असावे.

सूर्याची आकृती
ग्रीक संस्कृती मंत्रालय आणि पुरातत्वतज्ञांनी एकत्र मिळून या ठिकाणी उत्खनन केले होते, याचा उद्देश कलाकृतींमधील अर्थ जाणून घेण्यासोबत त्यांना भविष्याच्या पिढ्यांसाठी संरक्षित करणे होता. सांगाड्याच्या शिरावर त्याची श्रेष्ठता आणि पदाच्या खुणेच्या स्वरुपात एक प्रभावशाली कांस्याने निर्मित पट्टेदार मुकूट औपचारिक स्वरुपात ठेवण्यात आला होता. मुकूटाच्या केंद्रस्थानी मोठ्या ‘सूर्याच्या स्वरुपात’ निर्मित आकृती होती.
राजघराण्याशी संबंधित महिला
या मुकूटावर शाही शक्ती आणि अधिकाराचा प्रतीक मानण्यात येणारे समोरच्या बाजूने तेंड असलेले सिंह आणि सिंहिणीच्या जोडीचे चित्र आहे. परंतु या मुकूटाला डोक्यावर उलटे ठेवण्यात आले होते. यामुळे याच्या शोधाला एक रहस्यमय वळण मिळाले आहे. मुकूट उलटा ठेवण्याचा अर्थ एखाद्या शासकाच्या पतनाचे प्रतीक असू शकते. महिलेने ख्रिस्तपूर्व 7 व्या शतकाच्या अशांत काळादरम्यान स्वत:च्या सत्तेची स्थिती गमावली असावी असे मानले जातेय. दफन करण्यात आलेल्या महिलेच्या आसपासच्या क्षेत्रात अनेक विलासितापूर्ण वस्तू मिळाल्या आहेत. यात तांब्याची कर्णफुले, हाडं आणि हस्तिदंताचया कलाकृती, कांस्याच्या वस्तू सामील आहेत.

लहान मुलीचेही थडगे
महिलेला दफन करण्याची स्थिती आणि पद्धत ख्रिस्तपूर्व 7 व्या शतकाच्या मध्यातील बदलती सामाजिक स्थिती दर्शविते. त्या काळात वंशपरंपरागत राजेशाहीची लोकप्रियता कमी होत होती आणि अभिजातवर्ग चलनात येत होता. थडग्यांच्या याच समुहात जवळपास 4 वर्षांच्या मुलीचे थडगेही मिळाले आहेत. तिच्या डोक्यावर कांस्याने निर्मित मुकूट होता. हे थडगेही पुरातन काळातील असून यातही कुलीन महिलेप्रमाणे दागिने आढळून आले आहेत. दोघींदरम्यान पारिवारिक किंवा नातेवाईक संबंध होते असे यातून कळते.