For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भाजपचे 24 सदस्यीय शिष्टमंडळ आज दिल्लीत

06:54 AM Jan 18, 2026 IST | Tarun Bharat Portal
भाजपचे 24 सदस्यीय शिष्टमंडळ आज दिल्लीत
Advertisement

राष्ट्रीय अध्यक्ष निवड प्रक्रियेत घेणार भाग

Advertisement

प्रतिनिधी/ पणजी

भारतीय जनता पक्षाचे गोवा प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे 24 सदस्यीय शिष्टमंडळ रविवारी (ता. 18) दिल्लीला जाणार आहे.या शिष्टमंडळात प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्यासमवेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय ऊर्जा आणि नवीन आणि अक्षय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, उद्योगमंत्री माविन गुदिन्हो, माजी खासदार अॅङ नरेंद्र सावईकर त्याचबरोबरच पक्षाचे राज्य कार्यकारणीचे सदस्य आणि केंद्रीय कार्यकारणीवर गोव्याचे नियुक्त झालेले सदस्य दिल्लीला जाणार आहेत.

Advertisement

राष्ट्रीय अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेत गोव्याचे हे शिष्टमंडळ भाग घेणार असून, सोमवारी 19 रोजी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष निवडीसाठी अर्ज सादर करायचे आहेत. या निवडीला पाठिंबा देणारे पत्र 19 रोजी गोव्याचे भाजपचे हे शिष्टमंडळ सादर करणार आहेत. त्यानंतर 20 रोजी होणाऱ्या निवड प्रक्रियेच्या सोहळ्यामध्ये गोव्यातील हे सर्व नेते सहभागी होणार आहेत.

Advertisement
Tags :

.