दुबईत उभारणार 24 कॅरेटचा सोन्याचा मार्ग
जगातील पहिल्या ‘गोल्ड स्ट्रीट’ची जोरदार चर्चा
जगभरातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी दुबई सातत्याने नवनवीन उपक्रम राबवत असते. आता याच दुबईमध्ये 24 पॅरेट सोन्यापासून तयार करण्यात येणारा अनोखा पादचारी मार्ग उभारण्याची योजना जाहीर करण्यात आली आहे. ‘गोल्ड वॉकवे’ किंवा ‘गोल्ड स्ट्रीट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या प्रकल्पामुळे दुबईच्या पर्यटन क्षेत्रात आणखी एका आकर्षणाची भर पडणार आहे. दुबई गोल्ड डिस्ट्रिक्ट प्रशासनाच्या दाव्यानुसार, हा जगातील पहिला आणि सर्वांत लांब सोन्याचा मार्ग असेल. 2026 च्या अखेरपर्यंत हा मार्ग पर्यटकांसाठी खुला करण्याचे नियोजन आहे.
दुबई गोल्ड डिस्ट्रिक्टच्या व्यावसायिक विभागाचे वरिष्ठ संचालक रशीद अल हरमूदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा मार्ग पुढील दोन महिन्यांत सुरू करण्याचे नियोजन आहे. या ठिकाणी येणाऱ्या स्थानिक नागरिकांना आणि परदेशी पर्यटकांना सोने आणि दागिन्यांच्या बाजारपेठेत एक वेगळा अनुभव घेता येणार आहे. मात्र, या मार्गाची नेमकी लांबी, बांधकामाचा खर्च, सोन्याचे एकूण प्रमाण आणि त्याची रचना कशी असेल, याबाबत सविस्तर तांत्रिक माहिती अद्याप सार्वजनिक करण्यात आलेली नाही.
दुबई गोल्ड डिस्ट्रिक्टमध्ये प्रकल्पाची उभारणी
हा प्रस्तावित सुवर्णमार्ग दुबईतील दैरा परिसरात असलेल्या दुबई गोल्ड डिस्ट्रिक्टमध्ये उभारण्यात येणार आहे. या परिसराची ओळख सोने, चांदी, दागिने, मौल्यवान धातू आणि लक्झरी वस्तूंच्या व्यापारासाठी आहे. जानेवारी 2026 मध्ये या गोल्ड डिस्ट्रिक्टची अधिकृत सुऊवात करण्यात आली होती.
दुबई मीडिया कार्यालयाच्या माहितीनुसार, या परिसरात सोने, दागिने, सुगंधी उत्पादने, सौंदर्यप्रसाधने आणि जीवनशैलीशी संबंधित वस्तूंची एक हजारांहून अधिक दुकाने व व्यावसायिक आस्थापना आहेत. त्यामुळे हा परिसर केवळ खरेदीचे ठिकाण नसून आंतरराष्ट्रीय व्यापारी, गुंतवणूकदार आणि पर्यटकांसाठी महत्त्वाचे केंद्र बनत आहे. नव्या गोल्ड स्ट्रीटमुळे या भागात पर्यटकांची वर्दळ आणखी वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सोन्याच्या व्यापारातही वाढ
दुबई गोल्ड डिस्ट्रिक्टमध्ये पर्यटनाबरोबरच सोन्याच्या व्यापाराचा विस्तारही सुरू आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, 2026 च्या सुऊवातीपासून या परिसरात कार्यरत होऊ लागलेल्या घाऊक सोन्याच्या व्यापार कार्यालयांच्या संख्येत 20 टक्क्मयांनी वाढ झाली आहे. त्याच काळात सोने, दागिने, मौल्यवान खडे आणि महागड्या घड्याळांची विक्री करणाऱ्या नव्या दुकानांमध्ये 15 टक्क्मयांची वाढ नोंदवण्यात आली.
व्यापारातील वाढती मागणी लक्षात घेऊन परिसरात नवीन कार्यालये आणि किरकोळ विक्रीची दुकाने उभारण्याचे काम सुरू आहे. पुढील वर्षात या परिसरात स्थलांतरित होणाऱ्या कंपन्यांच्या संख्येत आणखी 10 ते 20 टक्क्मयांनी वाढ होऊ शकते, असा अंदाज रशीद अल हरमूदी यांनी व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर प्रस्तावित सुवर्णमार्गामुळे पर्यटन आणि व्यापार या दोन्ही क्षेत्रांना चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
मध्यपूर्वेतील मोठ्या दागिने प्रदर्शनाचीही योजना
गोल्ड स्ट्रीटबरोबरच दुबई गोल्ड डिस्ट्रिक्टमध्ये सोने आणि दागिन्यांच्या व्यापारासाठी मध्यपूर्वेतील सर्वांत मोठ्या प्रदर्शन केंद्रांपैकी एक उभारण्याची योजनाही आखण्यात आली आहे. या माध्यमातून विविध देशांतील व्यापारी, दागिने उत्पादक, घाऊक विव्रेते आणि गुंतवणूकदारांना एकाच ठिकाणी व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. संयुक्त अरब अमिरातीने 2024-25 या आर्थिक वर्षात सुमारे 53.41 अब्ज डॉलर किमतीचे सोने निर्यात केले होते, स्वित्झर्लंड, ब्रिटन, भारत, हाँगकाँग आणि तुर्किये हे त्याचे प्रमुख व्यापार भागीदार आहेत. त्यामुळे सोन्याच्या व्यापारातील जागतिक स्थान मजबूत ठेवण्यासाठी दुबईकडून पायाभूत सुविधा आणि पर्यटन आकर्षणांवर भर दिला जात आहे.
सोन्याचा संपूर्ण रस्ता की सोन्याचा पृष्ठभाग?
या प्रकल्पाबाबत सर्वाधिक उत्सुकता निर्माण करणारा प्रŽ म्हणजे संपूर्ण रस्ता शुद्ध सोन्यापासून तयार केला जाणार आहे का? सध्या उपलब्ध माहितीनुसार, प्रशासनाने हा मार्ग 24 पॅरेट सोन्याचा असल्याचे सांगितले आहे. मात्र, संपूर्ण रस्त्यात किती सोने वापरले जाणार, त्याचा पृष्ठभाग कसा असेल आणि सोन्याचा वापर कोणत्या बांधकाम तंत्राने केला जाणार, याचे तपशील अद्याप जाहीर झालेले नाहीत.
सोन्याच्या मार्गावरून चालण्याचा अनोखा अनुभव
सोन्याचे दागिने, आकर्षक आभूषणे आणि आलिशान जीवनशैलीसाठी प्रसिद्ध असलेल्या दुबईमध्ये आता सोन्याच्या मार्गावरून चालण्याचा अनुभव पर्यटकांना मिळणार आहे. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश केवळ एक आकर्षक रचना उभारणे एवढाच नसून, दुबईला जागतिक स्तरावरील सोने आणि दागिन्यांच्या व्यापाराचे प्रमुख केंद्र म्हणून अधिक बळकट करणे हाही आहे.
