For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

2025 मध्ये 23 टक्के भरतीत वाढीचा अंदाज

06:12 AM Dec 25, 2025 IST | Tarun Bharat Portal
2025 मध्ये 23 टक्के भरतीत वाढीचा अंदाज
Advertisement

नवी दिल्ली :

Advertisement

भारतात 2025 मध्ये विविध कंपन्यांकडून भरतीत 23 टक्के इतकी वाढ राहू शकते असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. नव्या वर्षात भरतीत स्थिर विकास दिसणार असल्याचेही सांगितले जात आहे.

फौंडीट यांच्या अहवालात ही माहिती दिली गेली आहे. 2025 मध्ये भारतीय कंपन्यांकडून नोकर भरतीत 23 टक्के वाढ केली जाण्याचा अंदाज आहे. टायर 2 व टायर 3 शहरांमध्ये विशेषतत्वाने नोकर भरतीचे प्रमाण विविध कंपन्यांच्या अस्तित्वामुळे वाढणार आहे. नव्या वर्षात नोकर भरतीचे प्रमाण 2.3 टक्के पॉइंटस्ने वाढलेले असणार आहे. जवळपास 12.8 दशलक्ष इतक्या नोकऱ्या नव्या वर्षात उपलब्ध होतील, असेही अहवालात म्हटले आहे. नव्या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत भरती अधिक प्रमाणात राहू शकते. डिजिटल, एआय, क्लाऊड, डाटा व सायबरसिक्युरिटी यासारख्या क्षेत्रांमध्ये प्रतिभावान उमेदवारांची मागणी वाढणार असल्याचेही समजते. ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक्स वस्तु कंपन्या, माध्यम कंपन्या, आरोग्य क्षेत्रातील कंपन्या भरतीत मोठे योगदान देतील.

Advertisement

2025 मध्ये इतर मोठ्या शहरांच्या तुलनेत टायर 2 शहरांचा भरती वाढवण्यात मोठा हातभार लाभला आहे. टेक, लॉजिस्टीक्स व रिटेल क्षेत्रात भरती करण्यात पुढाकार घेत आहेत.

Advertisement
Tags :

.