महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

200 वर्षे जुनी गवताची झोपडी

06:36 AM Dec 05, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

एका रात्रीत झाली होती निर्मिती, आता वाचविण्यासाठी लोकांची धडपड

Advertisement

पेम्ब्रोकशायरच्या लानीसेफनच्या नजीक एक 200 वर्षांपेक्षा जुनी गवताची झोपडी आहे. या ऐतिहासिक झोपडीची निर्मिती 1800 साली करण्यात आली होती. तेव्हा याला वेल्सची ‘टीवाय अन्नोस’ परंपरेच्या अंतर्गत केवळ एका रात्रीत निर्माण करण्यात आले होते. ज्यात 1968 पर्यंत दोन वृद्ध बहिणी राहत होत्या. त्यांच्यानंतर निम्म्या शतकापासून ही झोपडी रिकामी पडली आहे. आता स्थानिक लोक या प्राचीन झोपडीला वाचविण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

Advertisement

काय आहे टीवाय अन्नोस परंपरा

टीवाय अन्नोस परंपरा एखादा व्यक्ती संध्याकाळ आणि सकाळदरम्यान (एका रात्रीतच) सामान्य भूमीवर घर तयार करु शकतो का हे निश्चि करत असते. एका रात्रीत घर तयार करण्यास यश आल्यास संबंधित जमीन त्या व्यक्तीच्या मालकीची होती. टीवाय अन्नोस वेल्स भाषेतील शब्द असून याचा अर्थ एका रात्रीचे घर असा होतो.

कोण राहायचे?

या झोपडीत राहणाऱ्या अखेरच्या व्यक्ती मारिया आणि त्यांची बहिण होत्या. 1968 पर्यंत त्या पेनरहोस कॉटेजमध्ये राहिल्या. मारिया यांच्या बहिणीचा मृत्यू झाल्यावर त्या नजीकच्या एका गावात राहण्यासाठी गेल्या होत्या. तेव्हापासून ही झोपडी रिकामीच आहे. या झोपडीत दोघी बहिणी अत्यंत सामान्य जीवन जगत होत्या. आता या झोपडीत चिनी मातीचे कप आणि प्लेट्सनी भरलेले एक वेल्स ड्रेस आहे. तसेच या दोन्ही बहिणींकडून स्वयंपाक करण्यासाठी वापरण्यात येणारी सामग्री देखील आहे.

1849 मध्ये दगड, मात आणि भूशाच्या मिश्रणाचा वापर करत या झोपडीचे नुतनीकरण करण्यात आले होते. 1970 च्या दशकात स्थानिक परिषदेने ही झोपडी खरेदी केली होती. यानंतर ग्रामस्थांनी या घराच्या दुरुस्तीसाठी स्वयंसेवक आणि पैसे जमवून एक ग्रूप स्थापन केला होता. 1972 मध्ये याला एका संग्रहालयाच्या स्वरुपात खुले करण्यात आले होते, परंतु नंतर हे बंद पडले होते.

आता पुन्हा एकदा स्थानिक लोक याच्या संरक्षणासाठी एकजूट झाले ओत. ते पुन्हा एकदा यात एक संग्रहालय सुरू करू इच्छित आहेत. याला एका संग्रहालयाच्या स्वरुपात पुन्हा खुले करणे चांगले ठरेल, जेणेकरून लोकांना याचा अनुभव घेता येईल. हे ठिकाण माझ्या हृदयात स्थान मिळवून असल्याचे उद्गार स्थानिक लोकप्रतिनिधी इवांस यांनी काढले आहेत.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article