For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Child Sexual Assault अल्पवयीन मुलगी मामाच्या गावाला जात होती पण रेल्वे स्टेशनवरच नराधमाने तिला गाठले अन्

05:04 PM May 17, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
child sexual assault अल्पवयीन मुलगी मामाच्या गावाला जात होती पण रेल्वे स्टेशनवरच नराधमाने तिला गाठले अन्
Child sexual abuse
Advertisement

महिला आणि बालकांची सुरक्षितता गेल्या काही दिवसांपासून धोक्यात आली आहे की काय? अशी शंका वाटावी अशी काही प्रकरणं समोर येत आहेत. नुकत्याच घडलेल्या एका दुर्देवी घटनेत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. कल्याण रेल्वे स्थानक परिसरातून महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणणारी एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे.

Advertisement

खोपोली येथे राहणाऱ्या आपल्या मामाच्या घरी जाण्यासाठी निघालेल्या एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर रेल्वे यार्ड परिसरात लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे. ही पीडित मुलगी शनिवारी अहिल्यानगर येथून आपल्या मामाला भेटण्यासाठी आली होती.

त्यानंतर तिला पुढील प्रवासासाठी खोपोली येथे जायचे असल्याने ती कल्याण रेल्वे स्थानकावर ट्रेनची वाट पाहत थांबली होती. ती ट्रेनची प्रतीक्षा करत असतानाच रेल्वे स्थानक परिसरात तिला सौरभ सोनवणे नावाच्या एका तरुणाने पाहिले आणि ती एकटी असल्याचा फायदा घेतला.

Advertisement

 आरोपी सौरभ सोनवणेशी पिडीत तरुणीची कसलीही ओळख नव्हती. तरीही सोनवने याने  स्थानकावर त्या अल्पवयीन मुलीचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून तिला माझ्यासोबत पोलिस स्टेशनला चल असे सांगितले. मुंबई तकच्या वृत्तानुसार. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे ती मुलगी घाबरून गेली आणि तिने आरोपीकडे आपला मोबाईल फोन परत देण्याची विनंती केली.

त्यावर आरोपी सौरभ याने जर मोबाईल फोन परत हवा असेल तर माझ्यासोबत पोलीस स्टेशनला चल, असे सांगून तिची जाणीवपूर्वक दिशाभूल केली. मात्र, तिला पोलीस स्टेशनमध्ये नेण्याऐवजी आरोपीने तिला कल्याण रेल्वे यार्डाच्या निर्जन परिसरात नेले. त्या ठिकाणी कोणीही नसल्याचा फायदा घेऊन आरोपी सौरभ याने त्या निष्पाप मुलीवर बळजबरीने लैंगिक अत्याचार केले.

सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपी सापडला

घडलेल्या या भीषण प्रसंगातून स्वतःची कशीबशी सुटका करून घेतल्यानंतर ती अल्पवयीन मुलगी अत्यंत गंभीर आणि घाबरलेल्या अवस्थेत कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात (जीआरपी) पोहोचली.

आपल्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती तिने पोलिसांना दिली. त्यानंतर गांभीर्य ओळखून कल्याण जीआरपी पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंदवून घेतला पोलिस तपास सुरु झाला. या तपासात पोलिसांसाठी सर्वात महत्त्वाचा पुरावा ठरणार होता सीसीटिव्ही फुटेजचा. त्याप्रमाणे पोलिसांनी रेल्वे स्थानक आणि आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज अत्यंत बारकाईने तपासले. या तांत्रिक तपासाच्या आणि सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यात यश आले आणि अवघ्या काही वेळातच संशयित आरोपी सौरभ सोनवणे याला अटक केली.

पोलिसांची जलद कारवाई

अत्याचाराच्या या  गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी रेल्वे क्राईम ब्रांच आणि कल्याण जीआरपी पोलिसांनी संयुक्तपणे वेगाने कारवाई केली. पोलिसांनी पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपी सौरभ सोनवणे याला ताब्यात घेतले असून त्याला अटक करण्यात आली आहे.

रेल्वे स्थानकासारख्या गजबजलेल्या आणि सुरक्षित समजल्या जाणाऱ्या ठिकाणी एका अल्पवयीन मुलीची दिशाभूल करून रेल्वे यार्डात अत्याचार केल्याच्या या घटनेमुळे प्रवासी आणि परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कल्याण पोलिसांनी या प्रकरणाची अत्यंत गंभीर दखल घेतली असून कायद्यानुसार पुढील कडक कायदेशीर तपास आणि चौकशी सुरू केली आहे.

Advertisement
Tags :

.