महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

१४ वर्षीय मुलीला लग्नाचे आमिष दाखवून केले गरोदर

04:56 PM Sep 14, 2024 IST | Abhijeet Khandekar
Advertisement

आष्टा/वार्ताहर

14 वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार शाररिक संबंध ठेवत गरोदर केल्याप्रकरणी तसेच याप्रकरणी सहाय्य केल्याबद्दल दोघांच्या वर आष्टा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी जंगल्या उर्फ बाबू मलकार काळे आणि लेजंडी मलकार काळे दोघे राहणार कवठेमंकाळ यांच्यावर आष्टा पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

Advertisement

संबंधित अल्पवयीन मुलगी बावची येथे वास्तव्यास होती. सात महिन्यापूर्वी जंगला उर्फ बाबू मलकार काळे हा बावची येथे चार चाकी गाडी घेऊन आला. तसेच संबंधित अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून जंगल्या काळी आणि लेजंडी काळे यांनी कवठेमंकाळ येथे जंगल्या काळे यांच्या घरी नेले. या ठिकाणी संबंधित अल्पवयीन मुलगी आणि जंगल्या पती-पत्नी सारखे राहू लागले. जंगल्या काळे यांनी अल्पवयीन मुलीशी शाररिक संबंध ठेवून तिला गरोदर बनवले. याप्रकरणी संबंधित अल्पवयीन मुलीने आष्टा पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. पोलिसांनी दोघांच्या वर गुन्हा नोंद केला आहे. या घटनेचा अधिक तपास आष्टा पोलीस करत आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :
A 14-year-old girllured into marriage
Next Article